शिर्डी : अजितदादांना सत्तेची नव्हे तर महाराष्ट्र राज्याला अजितदादांची गरज आहे, असे अजितदादांचे काम आहे. विकासाचा वादा म्हणजेच अजितदादा, असे वक्तव्य अकोले विधानसभा मतदारसंघाचे (Akole Vidhan Sabha Constituency) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) आमदार डॉक्टर किरण लहामटे (Kiran lahamate) यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वेध लागले असून या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाचे नेते जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विविध यात्रा काढत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी देखील आपल्या मतदारसंघात तिरंगा जनसंवाद यात्रा काढलीय आहे. 15 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या यात्रेचा आज समारोप झाला. यावेळी निघालेल्या रॅलीत आमदार डिजेच्या तालावर आपल्या पत्नीसह भर चौकात फुगडी खेळण्याचा मोह आवरु शकले नाही.
विकासाचा वादा म्हणजेच अजितदादा : किरण लहामटे
अजितदादांना सत्तेची नव्हे तर महाराष्ट्र राज्याला अजितदादांची गरज आहे, अजितदादांचे काम आहे. विकासाचा वादा म्हणजेच अजितदादा असे आमदार लहामटे यांनी म्हटले आहे. तर अकोले विधानसभा मतदारसंघात घड्याळाचाच अधिकृत उमेदवार असेल आणि महायुतीत बंडखोरी झाली तर आनंदच होईल, असा टोला देखील त्यांनी वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांचं नाव न घेता लगावला. आता वैभव पिचड यावर काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
किरण लहामटे यांनी धरला डीजेच्या तालावर ठेका
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष हा जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करतोय. अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण लहामटे हे देखील गेल्या अनेक वर्षांपासून 15 ऑगस्टपासून मतदारसंघात तिरंगा जनसंवाद यात्रा काढतात. मतदार संघात केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा उद्देश असतो. या यात्रेचा समारोप मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी राजुर शहरातून निघालेल्या रॅलीत महिला व पुरुषांचे आदिवासी नृत्यपथक देखील सहभागी झालं होतं. आमदारांना देखील डीजेच्या तालावर नाचत आपल्या पत्नीसह फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या