अहमदनगर : ऐतिहासिक असा शेतकरी संप पुकारणाऱ्या पुणतांबा (Puntamba) गावातील ग्रामस्थांना रेल्वे प्रशासनाविरुद्ध पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ आली आहे पुणतांबा रेल्वे स्थानकावर (Puntamba Railway Station) एक्सप्रेस आणि आठ पॅसेंजर कोरोनापूर्वी थांबत होत्या. मात्र कोरोनानंतर या सर्व फेऱ्या रद्द झाल्या असून फक्त एकच डेमो रेल्वे पुणतांबा जंक्शनवर थांबत आहे. यामुळे प्रवाशांचे तर हाल होत आहेत. मात्र पुणतांबा गावच्या आर्थिक विकासावर देखील याचा परिणाम दिसू लागला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकांवर (Vidhan sabha Election) बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
बळीराजाच्या विविध मागण्यांसाठी पुणतांबा गावातील शेतकरी संपावर गेला. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावाने शेतकरी संप करत राज्यातील बळीराजाला कर्जमाफी मिळवून दिली. मात्र याच पुणतांबा गावचे ग्रामस्थ पुन्हा एकदा रेल्वे प्रशासना विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. कोरोनापूर्वी पुणतांबा रेल्वे जंक्शनवर एक एक्सप्रेस आणि आठ पॅसेंजर यांना थांबा होता. मात्र कोरोनानंतर या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून एकही रेल्वे या ठिकाणी थांबत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासन लक्ष देत नसल्याने प्रशासनाने जर लवकर लक्ष दिले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
रेल्वे स्थानक आहे मात्र रेल्वे नाही, आर्थिक विकास खुंटलाय
दरम्यान शिर्डी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी हा प्रश्न दिल्ली दरबारी मांडणार असल्याच स्पष्ट करत लवकरच श्रीरामपूर असेल किंवा पुणतांबा या परिसरात प्रत्येक रेल्वेला थांबा मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मत व्यक्त केलंय. गावात रेल्वे स्थानक आहे मात्र रेल्वे नाही आणि त्यामुळे आर्थिक विकास देखील खुंटलाय. नव्याने स्थापन झालेल केंद्र सरकार पुणतांबा गावाला न्याय देणार का हे आगामी काळात स्ष्ट होईल.
हे ही वाचा :
उत्तर महाराष्ट्रात महायुतीचा धुव्वा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांसह 6 विद्यमान खासदारांना घरचा रस्ता, पराभवाची कारणे काय?