अहमदनगर : सरकारने गॅस दर कमी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर टीका करताना, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गॅस दरात (Gas Cylinder Rate) कमी करण्यात आली, असे तुटपुंजे दर दिल्याने सामान्य नागरिकांच्या आर्थिक बोजा काही कमी होणार नाही, असं म्हंटलं होत. यावर भाजप आमदार राम शिंदे यांनी सुळेंवर जोरदार टीका केली असून असून 'सुप्रिया सुळेंची राजकारणाची गोची झाली आहे, म्हणून त्यांचे असे वक्तव्य येत असल्याचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले आहेत. 


आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) किमती 200 रुपयांनी कमी होणार आहेत. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (AnuragThakur) यांनी काल केली. यावरून राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारला धारेवर धरले होते होते. त्या म्हणाल्या होत्या की, हे 'जुमला' सरकार असून 200 रुपये कमी करून काय होणार आहे? आमचं सरकार सत्तेत असताना, 400 रुपये प्रति सिलिंडरचे दर होते. आज ते 1150 रुपये आहेत. त्यामानाने जवळपास 500 रुपये किंवा 700 रुपयांनी भाव कमी करायला हवे होते. हा सगळा निवडणूक 'जुमला' असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून आमदार राम शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. 


आमदार राम शिंदे म्हणाले की, 'सुप्रिया सुळेंची राजकारणाची गोची झाली आहे, म्हणून त्यांचे असे वक्तव्य येत आहे. अनेकदा दर वाढले तर का वाढले आणि दर कमी झाले तर का झाले, असं विरोधक विचारतात. मात्र पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. त्यामुळे आता गॅस सिलेंडरवरील दर 200 रुपयांनी कमी करण्यात आल्याचे राम शिंदे म्हणाले. याचबरोबर त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत आज सकाळी पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, 'मुंबईला केंद्रशासित प्रदेश करणं, मुंबईला कमजोर करणं, मुंबईवर महाराष्ट्राचा अधिकार राहू नये, म्हणून निती आयोग विकास करणार हा नवीन फंडा आहे. यावर राम शिंदे यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. 


संजय राऊतांवर पलटवार


केंद्र सरकारचा डोळा मुंबईवर आहे. केंद्र सरकारला मुंबई गिळायची आहे, असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हंटलं होत. यावर बोलताना भाजप आमदार राम शिंदे यांनी संजय राऊंतांवर पलटवार केला आहे. संजय राऊत यांचे मनसुबे पूर्णपणे धुळीस मिळाले आहेत. त्यामुळे सकाळी सकाळी ब्रश करण्याआधी आणि ब्रश केल्यानंतर ते असे वक्तव्य करतात. जगात भारताचा पाचवा क्रमांक लागतो, देशाची प्रगती का होत आहे, हे लोकांना कळत. मात्र केवळ मीडियात बातमी व्हावी, म्हणून संजय राऊत असे वक्तव्य करतात असं राम शिंदे म्हणाले. 



इतर महत्वाची बातमी :