Shirdi Saibaba : राज्यातील सर्व श्रीमंत असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबा संस्थान (Shirdi Saibaba) विश्वस्त मंडळासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 17 सदस्य असलेल्या विश्वस्त मंडळासाठी (Board of Trustees) राज्यभरातून तब्बल 539 जणांनी अर्ज दाखल झाले आहेत. हे सगळे अर्ज आता विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. यात अध्यक्ष पदासाठी 33 जणांनी तर उपाध्यक्ष पदासाठी 27 जणांनी अर्ज दाखल केले असून स्थानिकांना 50 टक्के जागा मिळाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शिर्डीचे साईबाबा (saibaba) हे अवघ्या जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान या देवस्थानच्या विश्वस्त पदावर वर्णी लागावी, म्हणून अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतात. एखाद्या राजकीय व्यक्तीच राजकीय पुनर्वसन सुद्धा विश्वस्त पद देऊन अनेकदा केल जात असल्याचं सिद्ध झालं. मात्र राजकीय व्यक्तींचा होत असलेला हस्तक्षेप पाहून सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत कोर्टात धाव घेतली आहे आणि त्यामुळेच साईबाबा संस्थान (Saibaba Sansthan) विश्वस्त मंडळ बरखास्त सुद्धा झालं आहे. सध्या साईबाबा संस्थानवर औरंगाबाद उच्च न्यायालयाने नेमलेली त्रिसदस्यीय समिती कामकाज पाहत असून राज्यात नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा विश्वस्त मंडळ पदाच्या हालचालींना सुरुवात झाली आहे.
दरम्यान विधी व न्याय विभागाने मागवलेल्या 17 सदस्यीय विश्वस्त पदाच्या राज्यभरातून 539 जणांचे अर्ज साईबाबा संस्थानला प्राप्त झाले. हे अर्ज आता राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र विश्वस्त मंडळ नेमताना स्थानिकांना 50 टक्के जागा द्याव्यात, अशी शिर्डी (Shirdi) ग्रामस्थांची जुनीच मागणी आहे यावेळी तरी ती पूर्ण करावी, अशी मागणी आता ग्रामस्थांनी पुढे आणली. स्थानिक प्रश्न व साईभक्तांच्या समस्या स्थानिकांना अधिक माहीत असल्याने शिर्डीच्या विकासाला जास्त प्राधान्य देता येईल, अस ग्रामस्थांच आहे. राज्यातील अनेक देवस्थानांमध्ये स्थानिक विश्वस्त असतात, तशा घटना सुद्धा त्यांनी बनवलेल्या आहेत.. सरकारने जर 50 टक्के स्थानिकांना जागा दिल्या नाही तर आम्हाला शासनाबरोबर भांडावे लागेल, आमच्या लोकप्रतिनिधींनी त्यासाठी नेतृत्व करायला हवं, अशी मागणी 15 वर्ष विश्वस्त पदाचा अनुभव असलेल्या डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनी केली आहे.
आतापर्यंत स्थानिकांना मोजक्याच जागा देण्यात आल्या. मात्र इथे येणाऱ्या भाविकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्थानिक असल्यास त्याचा अधिक फायदा होईल. साई भक्तांच्या समस्या सोडविण्यात अधिक गतिमानता यावी, अस वाटत असेल तर स्थानिक विश्वस्त अधिक हवे असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रमोद आहेर यांनी व्यक्त केल आहे. तर जेजुरीच्या खंडोबा देवस्थानमध्ये 50 टक्के स्थानिकांना जागा न मिळाल्याने आंदोलन करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली होती. त्याच पद्धतीने आता पुन्हा एकदा शिर्डीच्या साईबाबा विश्वस्त मंडळाची नेमणूक करताना सरकारने स्थानिकांना डावलल तर पुन्हा एकदा सरकार विरुद्ध स्थानिक असा वाद निर्माण झाला तर नवल वाटायला नको.
अशी आहे अर्जाची आकडेवारी
दरम्यान 17 सदस्यीय साईबाबा विश्वस्त मंडळ असून यासाठी राज्यभरातून 17 जागांसाठी 539 अर्ज दाखल झाले आहेत. अध्यक्षपदासाठी 33 तर उपाध्यक्ष पदासाठी 27 अर्ज आले आहेत. महिला कोट्यासाठी 33 अर्ज आले असून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 33 अर्ज आले आहेत. विशेषीकृत ज्ञान धारणा (विधी) 53 अर्ज आले असून याशिवाय विविध कोट्यातून अनेक अर्ज दाखल झाले आहेत.
इतर संबंधित बातम्या :