Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद हे समीकरण काही नवं नाही. गौतमीचा जिथे कार्यक्रम तिथे राडा होणारच. असंच काल (1 ऑगस्ट) अहमदनगरच्या (Ahmednagar) नागापूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ झाला. तसंच या कार्यक्रमावेळी दगडफेक झाल्याचीही माहिती आहे. 


गौतमीच्या कार्यक्रमाला महिलादेखील उपस्थित होत्या.  दरम्यान हुल्लडबाजांनी गोंधळ घातल्याने गौतमी पाटीलने अर्ध्यावरच आटोपला. सोबतच आयोजकांकडून कार्यक्रमासाठी व्यवस्थित बंदोबस्त नसेल तर कार्यक्रम करणार नसल्याचं देखील आता गौतमीने स्पष्ट सांगितलं आहे.


अहमदनगरच्या (Ahmednagar) नागापूर परिसरामध्ये लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कार्यक्रमादरम्यान किरकोळ दगडफेकही झाली. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. यातील एक महिला किरकोळ जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. 


गौतमी पाटीलने अर्ध्यावरच आपला कार्यक्रम केला बंद


अहमदनगरमधील हुल्लडबाजांनी गोंधळ घातल्याने गौतमी पाटीलने अर्ध्यावरच आपला कार्यक्रम बंद केला. सोबतच आयोजकांकडून कार्यक्रमासाठी व्यवस्थित बंदोबस्त नसेल तर कार्यक्रम करणार नसल्याचेदेखील तिने सांगितले आहे. अहमदनगरमधील  नवनागापूरच्या सरपंचाच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात हा गोंधळ झाला. एमआयडीसी पोलीस आणि खासगी बाऊन्सर्ससमोर हुल्लडबाजांनी धिंगाणा घातला. 


"... तर मी कार्यक्रम करणं बंद करेन" : गौतमी पाटील


नवगारापूरमधील कार्यक्रम रद्द करत गौतमी पाटील म्हणाली,"मी खूप दिवसांनी नृत्याचा कार्यक्रम करत होते. माझ्या कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात प्रेक्षक गर्दी करतात. अनेकदा समोर बसलेल्या प्रेक्षकांमुळे मागच्या प्रेक्षकांना दिसत नाही. त्यामुळे गोंधळ होत असतो. आताही तेच झालं. त्यामुळे मी लगेचच कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण प्रत्येक आयोजकाला मला सांगायचं आहे की, बंदोबस्त व्यवस्थित करा. माझ्या कार्यक्रमात जर नेहमीच गोंधळ होणार असेल तर मी इथून पुढे कार्यक्रम बंद करते...आणि खरचं करेल". 


आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर प्रचंड टीका झाली. पण तरीही तिने आपल्या अदाकरीने महाराष्ट्राला वेड लावलं आहे. बदनामीकडे दुर्लक्ष करत तिने नृत्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. तिचा 'घुंगरू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात तुफान राडा, नोटांची उधळण होत असते. गौतमी आपल्या नृत्याला अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप तिच्यावर अनेकांनी केला होता. पण तरीही तिच्या नृत्याची क्रेझ मात्र कायम आहे. 



संबंधित बातम्या


Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी; अवघ्या दहा मिनिटात कार्यक्रम पडला बंद