अहमदनगर : ठाकरे गटाच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा (Shirdi Loksabha) तिढा वाढण्याची शक्यता आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Vakchaure) बैठकीला मातोश्रीला पोहचले तर ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप (Babanrao Gholap) बैठकीला गैरहजर असल्याने शिर्डी लोकसभा मदतरसंघातील कोंडी अद्यापही फुटलेली नसल्याचे या निमित्ताने समोर आले. दुसरीकडे मला बैठकीला बोलवण्यात आलेलं नसल्याचे स्पष्टीकरण बबनराव घोलप यांनी दिले. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असल्याचे दिसून येत आहे. 


अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी दौरा केल्यानंतर येथील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. त्या दौऱ्यात भाऊसाहेब वाकचौरे यांना प्रोमोट करण्यात येत असल्याचे बोललं जात होतं. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते असलेले बबनराव घोलप यांची नाराजी राजीनामा (Resign) नाट्यांनंतर समोर आली. कारण भाऊसाहेब वाकचौरे हे आधीच अनेक पक्ष फिरून आल्यानंतर त्यांना ठाकरे गटात पक्ष प्रवेश दिला होता, त्यामुळे बबनराव घोलप नाराज आहेत. तर 'पक्षाकडून मला शिर्डी लोकसभा मतदार संघांत तयारी करायला सांगितली असल्याचे वाकचौरे यांनी म्हटले होते. त्यामुळे बबनराव घोलप नाराज आहेत, एकीकडे पक्षाने मतदारसंघाची बांधणीचे काम मला दिल्यांनतर नको असलेल्या माणसाला पुन्हा पक्षात घेतल्याने त्यांनी राजीनामा दिला. यामुळे हा तिढा अजूनही कायम आहे. 


काही दिवसांपूर्वीच शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Loksabha) उमेदवारी कुणाला द्यायची यासाठी शिवसेना भवनवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. बबनराव घोलप हे निष्ठावंत म्हणून आपल्याकडे राहिले आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला होता आणि संजय राऊत यांची भेट घेऊन आपली नाराजी घोलप यांनी दर्शवली होती. आज पुन्हा मातोश्रीवर शिर्डी लोकसभा मतदार संघाची बैठक आयोजित करण्यात आली आहे, त्या बैठकीला भाऊसाहेब वाकचौरे पोहचले आहेत, मात्र बबनराव घोलप हे उपस्थित नसल्याने तिढा कायम आहे. 


अजूनही बबनराव घोलप नाराज


उद्धव ठाकरे यांचा अहमदनगर (Ahmednagar) दौरा झाल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी माजी आमदार शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांना पाठवत आपली भूमिका जाहीर केली. यानंतर दोन दिवसांनी बबनराव घोलप यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. तत्पूर्वी संजय राऊत यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलवले होते. 'जर वाकचौरेंना उमेदवारी द्यायची होती, तर मला का आश्वासन दिले? माझं संपर्क प्रमुखपद का काढून घेण्यात आलं? शिवाय, उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्यासंदर्भात मला का कळवण्यात आलं नाही, असे सवाल विचारत घोलप यांनी पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आजच्या बैठकीला देखील उपस्थित नसल्याने चर्चाना उधाण आले आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Shirdi Loksabha : शिवसेना भवनमध्ये बैठक पण शिर्डीचा तिढा कायम; बबनराव घोलप यांच्या कार्यकर्त्यांचा वाकचौरे यांच्या उमेदवारीला विरोध