अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील बिबट्याचा व्हिडिओ (Leopard Video) समोर आला आहे. रात्री अकरा वाजेच्या सुमारास कोपरगावच्या बसस्थानकावर बिबट्याचे दर्शन झाले. यावेळी स्थानिक नागरिकांनी गोंधळ घालत तरुणांनी फोटो, व्हिडिओ काढत खोडसाळपणा केला. वनविभागाने तातडीने पोहचत रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले, मात्र बघ्यांच्या गर्दीमुळे आधीच भांबावलेल्या बिबट्याने धूम ठोकली. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील काही भागात बिबट्याच्या दर्शन नित्याचे झाले आहे. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव Kopargaon) बस स्थानक परिसरातील दत्त मंदिराच्या मागे काल रात्री 11 वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. यावेळी वनविभागाच्या वतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र जाळे लावताच बिबट्याने (Leopard Sight) धूम ठोकत मानवी वस्ती गाठली. बिबट्याने दोन जणांवर हल्ला केला तर वन विभाग कर्मचारी थोडक्यात बचावला. मात्र पुन्हा एकदा बघ्यांच्या भूमिकेमुळे बिबट्याला सळो कि पळो करून ठेवल्याचे व्हिडिओत दिसते आहे. त्यामुळे बिबट्याची हतबलता पाहायला मिळाली. 


कोपरगाव शहरात बिबटया आल्याने तरुणांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आणि विशेष म्हणजे बिबट्याच्या बरोबरीने चालत ही मुले फोटो घेत होती. सदर बिबट्या आजारी असण्याची शक्यता वनविभागाकडून (Forest) सांगण्यात आली असून काल मध्यरात्री पुन्हा सदर बिबट्या बस स्थानक परिसरात असलेल्या काटवणात लपून बसलेला होता. यावेळी पोलीस आणि वन विभाग प्रशासन त्याठिकाणी पोहचले आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र नागरिकांनी अचानक गर्दी करून आरडा ओरड केल्याने बिबटया त्या ठिकाणाहून निसटला आणि सुभाषनगर भागात पोहचला. या ठिकाणी बघ्यांची गर्दी असल्याने आणि काही खोडसाळ तरूण त्याला दगड मारून डिवचून देत असल्याने चवताळलेल्या बिबट्याचे दोन जणांवर हल्ला (Leopard Attack) करत जखमी केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांनंतर बिबटया पुन्हा बस स्थानकाजवळील काटवनात लपून बसला असून वन विभागाने दोन ठिकाणी जाळी लावली असून पोलिसांनी काळजी नागरिकांना घेण्याचं आवाहन केल आहे. 


बिबट्याचा व्हिडीओ व्हायरल 


दरम्यान कोपरगाव बसस्थानकावर काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास बिबट्या निश्चिल अवस्थेत आढळून आला. हा बिबट्या रस्त्याच्या कडेने जात असल्याचे लक्षात येत आहे. याचवेळी बघ्यांचा भलामोठा ताफा आरडाओरड करत बिबट्याचे फोटो शूट करताना व्हिडिओत दिसत आहे. त्याचबरोबर मोठमोठ्याने आरोळ्या देत बिबट्याला दगड मारून डिवचल्याचे दिसून येत आहे. उशीरानंतर वनविभागाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर बघ्यांची गर्दी वाढतच होती. शेवटी रेस्क्यूऑपरेशन सुरु झालं, मात्र या बघ्यांच्या गर्दीमुळे बिबट्या निसटला. याच परिसरातील काटवनात लपला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.. मात्र मात्र या सगळ्यात बिबट्याचे दुखणे कुणी समजून घेताना दिसत नसल्याचे परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. 


 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik Leopard : उपाशी, आजारी बिबट्या, नागरिकांचे फोटोसेशन; इगतपुरी परिसरातील घटना