अहमदनगर : नाशिकच्या (Nashik) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. एकीकडे लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाकडून दक्षता जनजागृती सप्ताह सुरु असताना दुसरीकडे अहमदनगरमध्ये (Ahmednagar) सहाय्यक अभियंत्यास एक कोटी रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. तर धुळ्याचा (Dhule) तत्कालीन अभियंता देखील यात असून तो मात्र फरार झाला आहे. 


छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajianagar) येथील शासकीय ठेकेदाराने नाशिकच्या एसीबी (Nashik ACB) विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर अधीक्षक वालावलकर यांच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. यात अहमदनगर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यास अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणात धुळ्याचा अभियंता गणेश वाघ यांचा देखील समावेश असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र तो फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. एमआयडिसीतील (MIDC) कामाची बक्षिसी म्हणून शासकीय ठेकेदाराकडे एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दक्षता सप्ताह सुरु असताना मोठी कारवाई केली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदारास अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत मुळा डॅम ते तेहरे या भागामध्ये 1000 मिमीची लोखंडी पाईपलाईन करण्याचे काम दिले होते. या कामाचं कॉन्ट्रॅक्ट शासकीय ठेकेदारास 31.67 कोटी रुपयांना देण्यात आल होते. त्याची साधारण सुरक्षा ठेव 94 लाख आणि अनामत रक्कम एक कोटी 67 लाख रुपये होती. हे काम झाल्यानंतर 14.11 लाखांचं एक बिल असे 2.66 कोटी रुपयांचे बिल बाकी होतं. दरम्यान जे काम केलं होतं, त्याची बक्षिशी म्हणून हा सहाय्यक अभियंता वेळोवेळी लाचेची मागणी करत होता. याबाबत 20 ऑक्टोबरला पडताळणी झाली. तरीही वेळोवेळी ठेकेदाराने रक्कम कमी अधिक करण्याचा प्रयत्न केला, मात्र एक कोटींपेक्षा कमी पैसे न घेण्याचा अभियंत्यांना सांगितलं. 


'तुुझ्या कष्टामुळेच हे चांगलं फळ मिळाले आहे.'


त्यानंतर काल 03 नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची रक्कम स्वीकारताना अभियंत्यास अटक केली आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात अशी माहिती समोर आली की तत्कालीन उपअभियंता आणि आताचा सहाय्यक अभियंता यांच्यात लाचेची रक्कम मागणी करण्याआधी आणि रक्कम स्वीकारल्यानंतरचे संभाषण समोर आले आहे. यात शेवटी तत्कालीन उपअभियंता म्हणतो की, 'तुुझ्या कष्टामुळेच हे चांगलं फळ मिळाले आहे.' दरम्यान सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यास अटक करण्यात आली तर धुळे येथील तत्कालीन उपअभियंताहा फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. 


नाशिक विभाग अव्वल 


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यावेळी म्हणाले की, भ्रष्टाचार विरोधी जनजागृती दक्षता सप्ताह सुरू असून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. लाच घेणं आणि लाच देणं हे दोन्ही गुन्हे आहेत. या अनुषंगाने माणसाच्या भौतिक, आर्थिक सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार प्रमुख अडचण असून त्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमाने कंबर कसली आहे. आतापर्यंत 700 हुन अधिक सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना पकडण्याचं काम या वर्षभरात झालं आहे. यात 140 कारवायांच्या माध्यमातून नाशिक विभाग अव्वल आहे. 1988 चा कायदा 2018 मध्ये बदलण्यात आला आणि कारवाई वाढल्या आहे. त्यानुसार अनेक अधिकाऱ्यांची अपसंपत्ती तपासणी देखील या विभागाकडून केली जाते



इतर महत्वाची बातमी : 


Ahmednagar : 'तुझा हिस्सा राहू दे तुला, माझ्या हिस्स्याचं कळवतो तुला', बापरे! तब्बल एक कोटी रुपयांची लाच स्विकारली!