Ahmednagar News अहमदनगर : सावेडी येथील साई मिडास टच या कॉम्प्लेक्सला (Sai Midas Touch Complex) मंगळवारी भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एचडीबी फायनान्स आणि स्वास्तिक नेत्रालय हॉस्पिटल (Hospital) जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. 


नगर-मनमाड रोडवरील (Ahmednagar - Manmad Road) साई मिडास (डौले हॉस्पिटल चौक) या इमारतीमध्ये बँका, पतसंस्था, सोन्या-चांदीचे दुकाने, दवाखाना तसेच फायनान्स कंपनीची कार्यालये आहेत. या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर एका फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शेजारीच एक डोळ्यांचा दवाखाना ही आहे. या कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूने सकाळी साडेनऊच्या सुमारास थोडी आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. 


कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही


काही क्षणातच ही आग भडकली आणि आगीसोबत मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडू लागला. ही बाब स्थानिकांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला (Fire brigade) कळवली. अग्निशमन विभागाने तत्काळ बंब दाखल झाला आणि पाण्याच्या फवाऱ्याने ही आग विझवण्यात यश आले. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र इमारतीवरील काही फर्निचरचा भाग खाली कोसळला.


आजूबाजूच्या दुकानांना बसली झळ


आगीवर नियंत्रणासाठी मारलेल्या पाण्यामुळे आकाशात मोठ्या प्रमाणात धूर दिसू लागला. आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने आजूबाजूच्या दुकानांना त्याची झळ बसली. यामुळे नगर-मनमाड महामार्गावरील वाहतुकीची कोंडी (Traffic Jam) झाली. आकाशात धुराचे लोट दिसत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांना आग पाहण्यासाठी यावेळी गर्दी केल्याचे दिसून आले. 


मुसळगाव एमआयडीसीतील कारखान्यात आग


सिन्नर तालुक्यातील (Sinnar) मुसळगाव (Musalgaon MIDC) येथील आदिमा प्रायव्हेट लिमटेड या कारखान्यात 2 फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. कारखान्यात झालेल्या स्फोटांमुळे एमआयडीसी परिसर हादरला. आगीमुळे संपूर्ण एमआयडीसी परिसरात (MIDC) धुराचे लोळ पसरल्याचे चित्र होते. आगीमुळे (Fire) कारखान्याचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने कारखान्यातील 50 ते 60 कामगार सुखरूप होते. अग्निशामक बंबाद्वारे (Fire brigade) आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले . आग इतकी भीषण होती की, आगीचे लोळ 10 ते 15 किलोमीटरवरून दिसत होते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.


इतर महत्वाच्या बातम्या