अहिल्यानगर: केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करण्यात येत आहे. विविध योजनांच्या लाभासाठी देखील आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करणं आवश्यक करण्यात आलं आहे. याशिवाय आधार कार्ड आणि बँक खातं देखील लिंक करण्यात येत आहे. आता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना देखील आधार कार्डसह केवायसी पूर्ण करावं लागणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 90 टक्के लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता 14 हजार महिलांचं केवायसी पूर्ण झालेलं नाही ते लवकर करुन न घेतल्या मार्चपासून अनुदान मिळणं बंद होणार आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निराधार महिलांना मासिक मदत दिली जाते. श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना म्हटलं जातं. मात्र या योजनेतील महिलांना आता मदत मिळण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक केलं आहे.अन्यथा मार्च नंतर मिळणारी मदत बंद होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1 लाख 45 हजार 515 महिलांना या योजनेतून मदत दिली जाते. या महिलांपैकी 1 लाख 31 हजार 356 महिलांनी केवायसी केले आहे. तर 14 हजार 159 महिलांनी आणखी आपले आधार कार्ड तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात सादर केले नाही. या महिलांनी मदतीचा लाभ मिळण्यासाठी आपल्या आधार कार्ड देण्याचं आवाहन योजनेचे उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी केला आहे.
अतुल चोरमारे काय म्हणाले?
अहिल्यानगर सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आहे त्यामध्ये 40 हजार लाभार्थी आहेत. त्या सर्व लाभार्थ्यांचं आधार सीडींग पूर्ण झालं आहे. राज्य पुरस्कृत योजनांमध्ये त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे. त्याचे जिल्ह्यात 1 लाख 45 हजार लाभार्थी आहेत. त्यापैकी 14 हजार लाभार्थींचं आधार सीडींगचं काम राहिलं आहे. जवळपास 90 टक्के काम पूर्ण झालं असून अहिल्यानगर जिल्हा हा राज्यामध्ये या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. ज्या लाभार्थ्यांचं ई केवायसी पूर्ण करुन घेणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांचं ई केवायसी पूर्ण होणार नाही. त्या लाभार्थ्यांचा लाभ मार्च महिन्यापासून बंद होणार आहे.
लाभ बंद होऊ नये म्हणून लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयाची संजय गांधी निराधार योजनेची शाखा आहे तिथं संपर्क करायचा आहे. तिथं आधार कार्ड ज्या मोबाईल क्रमांकाशी लिंक झालेलं आहे. तिथं त्यांची ई केवायसी पूर्ण होणार आहे, अशी माहिती अतुल चोरमारे यांनी दिली.
इतर बातम्या :