Age Gap Relationship : "प्रेम आंधळे असते असे म्हटले जाते. एकादा एखाद्या व्यक्तीमध्ये जीव गुंतला की, माणूस त्याच्यासाठी काहीही करु शकतो. मग, त्यामध्ये वयाच्या, रंगाच्या आणि इतर कोणत्याही मर्यादा राहत नाहीत." असे म्हटले जाते. या बाबींना आणखी एका प्रियकर आणि प्रियसीने सिद्ध केलंय. या जोडप्यामध्ये वयामध्ये तब्बल 42 वर्षांचे अंतर आहे. आम्ही आमच्या रिलेशनमुळे आनंदी आहोत, असे मत या प्रियकर आणि प्रियसीने व्यक्त केलंय. यातील प्रियसीचे वय 18 आहे तर प्रियकर 60 वर्षीय वृद्ध आहे. सध्या अनेक मुलांना मिळत नाहीत. मात्र, ही 18 वर्षीय तरुणी वृद्धाच्या प्रेमात पडलीये. 


तरुणी आपल्या प्रियकराबरोबर डेटवर जाताना देखील फार विचार करतात. मात्र,वयामध्ये 42 वर्षांचे अंतर असतानाही हे जोडपे आम्ही एकमेकांना डेट करत असल्याची कबुली देत आहे. यातील प्रियसीचे नाव कीशा लुईस असे आहे. लोक आमच्या रिलेशिपवर जळतात, असे मत या 60 वर्षीय वृद्धाने व्यक्त केलंय. त्यांच्या बद्दल वाईट पद्धतीने व्यक्त होणाऱ्या लोकांना तिने सडेतोड उत्तर दिलंय. 


मीडिया रिपोर्ट्नुसार, कीशा लुईस ही सोशल मीडियावर सक्रीय असते. ती एक एन्फ्ल्युएन्सर आहे. शिवाय, ती फिटनेस एक्स्पर्ट म्हणून देखील काम करते. ती स्वत:ही एकदम फिट आहे. तिच्या बॉयफ्रेंडचे नाव 'दिमत्रियास'असे आहे. हे जोडपे रोज एकत्रितपणे व्यायामदेखील करताना दिसते. दोघांनाही फिट राहायला आवडते. दोघे सतत रोमांटिक व्हिडिओ शेअर करताना दिसतात. 


2022 पासून डेटिंग सुरु 


कीशा आणि दिमत्रियास यांनी 2022 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केलीये. कीशा लुईस आणि दिमत्रियास या जोडप्याला सोशल मीडियावर सातत्याने ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. "अनेक लोक म्हणतात की, यांची रिलेशनशिप चुकीची आहे". "पैसा असला की माणूस कसा  खूश राहू शकतो पाहा," अशी कमेंट एका युजरने केली आहे."लोक आमच्या रिलेशनशिपवर जळतात" असे मत दिमत्रियास यांनी व्यक्त केले होते. कीशानेही लोकांना अशाच पद्धतीने उत्तर दिले आहे. 


कीशाने ट्रोलिंग करणाऱ्या लोकांना दिले उत्तर 


कीशान लुईस हिने ट्रोलिंग करणाऱ्या लोकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कीशा म्हणाली, आम्ही जे करत आहोत ते कायदेशीर आहे. आम्ही कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. आम्ही जर कायद्यांचे उल्लंघन केले असते तर चिंतेची बाब झाली असती. शिवाय, आम्हाला त्यामुळे तुरुंगातही जावे लागले असते. मी त्यांच्या मुलीची दोस्त आहे. तुम्हाला आमची चिंता का सतावत आहे? असा सवालही तिने केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


VIDEO: 'तारक मेहता'मधील ‘भिडे मास्तर’ ची लेक अडकणार लग्नबंधनात; सोनूला बॉयफ्रेंडनं फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज