Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: छोट्या पडद्यावरील  तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या शोमुळे अभिनेत्री झील मेहताला (Jheel Mehta) विशेष लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये तिनं  ‘भिडे मास्तर’ यांची लेक सोनूची भूमिका साकारली होती. झील मेहता ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. झीलच्या बॉयफ्रेंडनं तिला लग्नासाठी प्रपोज केले आहे. नुकताच झीलनं  सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये झीलचा बॉयफ्रेंडनं तिला  फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज करताना दिसत आहे.


झीलला फिल्मी बॉयफ्रेंडनं स्टाईलमध्ये केल प्रपोज


 झीलनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पिंक कलरचा ड्रेस आणि मोकळे केस अशा स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये झीलचा होणारा पती डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला झीलनं कॅप्शन दिलं, "कोई मिल गया, मेरा दिल गया"


सोनूच्या व्हिडीओला 'टप्पू'ची खास कमेंट


झीलनं शेअर केलेला व्हिडीओ अभिनेता भव्य गांधी यांनीही कमेंट केली आहे. त्याने रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे. शोमध्ये भव्या छोटे टपूची भूमिका साकारत होती. या शोमध्ये भव्य आणि झीलची मैत्री खूप आवडली होती.


पाहा व्हिडीओ:






झील मेहताने तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये सोनूची भूमिका साकारली होती. तिची भूमिका आणि अभिनय  प्रेक्षकांना खूप आवडला होता. तिने मध्यंतरी शो सोडला. तारक मेहता सोडल्यानंतर ती कोणत्याही शोमध्ये दिसली नाही.


झील सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. तिचे जवळपास 3 लाख फॉलोअर्स आहेत. झील तिच्या फॅशनमुळे देखील चर्चेत असते. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो आणि व्हिडीओही शेअर करत असते. तिच्या व्हिडीओ आणि फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. 


2008  मध्ये  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Taarak Mehta ka ooltah chashmah: Boycott TMKOC ट्रेंडनंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' घेणार प्रेक्षकांचा निरोप? असित मोदी म्हणाले...