ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2020 | मंगळवार
  1. बिहारमध्ये मतमोजणीच्या कलानुसार एनडीएची आघाडी कायम, एनडीए 123 तर महागठबंधन 112 जागांवर पुढे, मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता, पूर्ण मतमोजणीनंतर चित्र बदलणार की कायम राहणार? याची उत्सुकता https://bit.ly/3ngsu7T
 
  1. गुजरात विधानसभा पोटनिवडणूकीत सर्व आठ जागांवर भाजप आघाडीवर, मध्यप्रदेश पोट निवडणुकीत 28 पैकी भाजप 19 ठिकाणी तर काँग्रेसची सात जागांवर आघाडी, यूपीत 7 पैकी 6 ठिकाणी भाजप आघाडीवर https://bit.ly/36k3hT3
 
  1. एसटी महामंडळाला सरकारकडून एक हजार कोटींचं पॅकेज, दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना थकीत तीनही महिन्यांचं वेतन देणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा https://bit.ly/3neTqot
 
  1. 23 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळेत नववी ते बारावी या वर्गांचं चाळीस मिनिटांच्या फक्त चार तासिकाचं अध्यापन होणार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा https://bit.ly/32xOTW9
 
  1. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास रस्त्यावरील लढाई तीव्र करू, ओबीसींच्या गोलमेज परिषदेत एकमुखाने निर्णय https://bit.ly/3pe4GTN
 
  1. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीमध्ये सराफा दुकानाला बोगदा पाडून धाडसी चोरी, 18 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास https://bit.ly/32vg2cu
 
  1. दाऊदच्या रत्नागिरीतील 'हवेली'चा लिलाव पूर्ण, दिल्लीचे वकील अजय श्रीवास्तव यांनी 11 लाखांची सर्वाधिक बोली लावून घेतला हवेलीचा ताबा https://bit.ly/3kcCcWF
 
  1. अनैतिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रियकराच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला, महिला बँक अधिकाऱ्याला अटक https://bit.ly/3pbQ5rY
 
  1. महिलांच्या टी 20 चॅलेंज क्रिकेट स्पर्धेत स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्स संघाला पहिलेवहिले विजेतेपद, सुपरनोव्हाजवर 16 धावांनी विजय https://bit.ly/2IrqpXC
 
  1. मुंबई पाचव्यांदा फडकवणार विजयाची पताका की दिल्ली मारणार पहिल्यांदाच बाजी? आज होणार निर्णय https://bit.ly/36jxz8x आकड्यांमध्ये दिल्लीच्या तुलनेत मुंबईचं पारडं जड https://bit.ly/38vneZY
  ABP माझा स्पेशल : व्वा! सरपंच असावा तर असा, अशी केली गावकऱ्यांची दिवाळी 'गोड' https://bit.ly/2GMjVlr ABP माझा Movie Review  लक्ष्मी - पुरेपूर अपेक्षाभंग! https://bit.ly/3kgihq1 युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv