मुंबई : बिहारचे सर्व निकाल समोर आलेले नाहीत. रात्री 10-11 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल. नितीशबाबू तिसऱ्या नंबरवर आहेत. तीनदा मुख्यमंत्री राहूनही त्यांची पार्टी तीन नंबरवर जात असेल तर विचार करण्याची वेळ आलीय. सरकार फेल गेलीय, हेच समोर आलं आहे. मॅन ऑफ द मॅच तेजस्वी यादव आहेत. कधी कधी मॅच हरल्यावरही त्यातील एकाला मॅन ऑफ द मॅच दिली जाते, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.


सर्व निवडणुकीत तेजस्वीचा चेहरा राष्ट्रीय राजकारणात समोर आला. कुणाचाही सपोर्ट नसताना अशा प्रतिकूल परिस्थितीत एकटा लढतोय. मुख्यमंत्री तीनदा राहूनही त्यांची पार्टी तीन नंबरवर जात असेल तर विचार करण्याची वेळ आलीय. सरकार फेल गेलीय, हेच समोर आलं आहे. नितीशबाबूंनी सेनेला धन्यवाद दिले पाहिजे. भाजप आता मित्रांना व्यवस्थित वागवतंय. आता देवेंद्र फडणवीस हे बिहारचे प्रमुख होते. त्यांचे अभिनंदन नक्कीच पण तेजस्वीनं सर्वांना कामाला लावले, सर्वांना फेस आणला. सुशांत सिंह प्रकरणाचा फायदा झाल्याचे दिसत नाही. मतमोजणी प्रक्रिया खूप हळू चालली आहे. काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली असती तर आतापर्यंत तेजस्वी मुख्यमंत्री झाले असते.


Bihar Election Result: आतापर्यंत केवळ 20 टक्के मतमोजणी, निकाल स्पष्ट व्हायला उशीर : निवडणूक आयोग


बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय आज होणार आहे. मागील 15 वर्षांपासून नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. ताज्या आकडेवारीनुसार आरजेडी, काँग्रेस महागठबंधन 106 जागांवर आघाडीवर तर भाजप आणि जेडीयू एनडीए 127 जागांवर आघाडीवर आहे. महागठबंधनमध्ये आरजेडी 66, काँग्रेस 21 जागांवर तर एनडीएमध्ये भाजप 74, जेडीयू 48, हम दोन जागांवर आघाडीवर आहेत तर 33 जागांवर इतर उमेदवार आघाडीवर आहेत.

राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रात 414 हॉल बनवले आहेत. कोरोना काळात झालेली भारततील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. यामुळं निवडणूक आयोगानं मतमोजणी केंद्रांची संख्या दीडपट वाढवली आहे. या सर्वांचा मेळ लावण्यासाठी अतिरिक्त वेळ लागू शकतो, हे आधीच स्पष्ट झालं होतं.


Bihar Election Results 2020 | नितीश कुमार बिहारचे थकलेले 'बाहुबली'?