Yashwant Student Scheme : एबीपी माझा काही दिवसापूर्वी सर्वसामान्य धनगर समाजाच्या मुलांना नामांकित इंग्रजी शाळेत शिकता यावं म्हणून श्रीमंत राजे यशवंतराव होळकर (Maharashtra Dhangar Community Yojana) यांच्या नावे योजना अंमलात आणण्यात आली होती. बहूजन कल्याण मंत्रालयाकडून हि योजना राबवली जाते. या योजनेच्या धनगर समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षणाबरोबरच वस्तीगृहाची सोय करण्यात येते. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे प्रतिवर्षी 70 हजार रुपये देण्यात येतात. मात्र अनेक ठिकाणी विद्यार्थी, वसतिगृह आणि सगळंच काही कागदावर असल्याचं एबीपी माझानं उघड केलं होते. तसेच संस्थाचालक गोरगरीब घनगर समाजाच्या मुलांच्या शिक्षणाच्या पैस्यांवर डल्ला मारत होती. एबीपी माझाने बातमी दाखवली त्याच वेळी दोन शाळेचे परवाने रद्द करण्यात आले होते. तर तात्काळ चौकशीही करण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशी अहवालानंतर आता पुन्हा 23 इंग्रजी शाळांची धनगर समाजाच्या मुलांच्या वस्तीगृहासाठीची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यात संभाजीनगरमधील एक, बीडमधील दोन तर जालन्यातील 20 वस्तीग्रहांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये रावसाहेब दानवे यांच्या पत्नीच्या नावे असलेली एक शाळा, शिवाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या माजी नगराध्यक्ष असलेल्या व्यक्तीच्या दोन शाळा आणि भाजपा पदाधिकाऱ्यांच्या शाळेचा ही समावेश आहे.
संस्था आणि शाळेचे नांव
1)- गणेश एज्यु. फाउंडेशन, पाचनवडगाव, ता.जि.जालना. संचलित गोल्डन किड्स इंग्लिश स्कुल, खरपुडी, ता.जि. जालना.
(संस्थाचालक - गणेश सुलताने)
2)श्री. गजानन बहु. सेवाभावी संस्थां, नजीक पांगरी संचलित किंग शिवाजी इंटरनॅशनल स्कूल, रेवगाव, ता.जि. जालना.
(संस्थाचालक - गजानन वाळके..,)
3)जगदंबा बहुउद्देशिय संस्था, हेलस, ता. मंठा, जि. जालना संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल, केंधळी, ता. मंठा, जि. जालना.
(संस्थाचालक -पांडुरंग खराबे)
4)अशोक भाऊ चव्हाण बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, मंठा, जि. जालना संचलित अशोका पब्लिक स्कूल अॅण्ड ज्यु. कॉलेज, हेलसा, ता. मंठा, जि. जालना.
(संस्थाचालक - संजय चव्हाण)
5)लक्ष्मीबाई शिक्षण प्रसारक मंडळ राजुर, ता. भोकरदन जि. जालना संचलित डायनामिक इंग्लिश स्कुल, राजुर, ता. भोकरदन, जि. जालना.
(संस्थाचालक - खरात)
6)मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राजूर (ग) ता. भोकरदन संचलित मराठवाडा रेडियंट इंग्लिश स्कूल भोकरदन, ता. भोकरदन, जि. जालना.
(संस्थाचालक - निर्मलाताई) रावसाहेब दानवे
7)सरस्वती बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ, पिंपळगाव रे. ता. भोकरदन, जि. जालना संचलित सरस्वती इंग्लिश स्कुल, पिंपळगाव रेणुकाई, ता. भोकरदन, जि. जालना.
(संस्थाचालक - राजेंद्र देशमुख) भाजप पदाधिकारी)
8)शिवराज बहुउद्देशिय सेवाभावी प्रतिष्ठान, संत सावता इंग्लिश स्कूल वडीगोद्री..
(संस्थाचालक - सचिन जाधव)
9)श्री. विज्ञानेश्वर शिक्षण संस्था, जि. जालना संचलित आर.पी. इंटरनॅशनल स्कुल, ता. अंबड, जि. जालना.
(संस्थाचालक - भरत भांदरगे)
10)श्री. गजानन बहु. सेवाभावी संस्था, नजिक पांगरी, ता. बदनापुर, जि. जालना संचलित जिजाऊ इंग्लिश स्कुल, शेलगाव, ता. बदनापूर, जि. जालना.
(संस्थाचालक - गजानन वाळके )
11)श्री. विद्यांचल शिक्षण संस्था जालना संचलित व्ही एस एस स्कुल, बदनापूर, जि. जालना..
(संस्थाचालक - शिवाजी मदन)
12)श्री. विज्ञानेश्वर शिक्षण संस्था, जालना संचलित आर.पी. इंग्लीश मिडीयम स्कुल, बदनापूर, जि. जालना.
(संस्थाचालक -भरत भांदरगे))
13)श्री. विज्ञानेश्वर शिक्षण संस्था, जि. जालना संचलित आर.पी. इंटरनॅशनल स्कुल, बदनापूर, जि. जालना.
(संस्थाचालक - भरत भांदरगे)
14)ओमशांती बहुउददेशिय शिक्षण संस्था, छ. संभाजीनगर संचलित देसरडा पब्लिक स्कूल, शेलगाव, ता. बदनापूर, जि. जालना.
(संस्थाचालक - डॉ देसरडा)
15)जगदेश्वरी ग्रामीण विकास प्रतिष्ठाण वडाळा, ता. जाफ्राबाद जि. जालना संचलित लिटल स्टार इंग्लिश स्कुल, वडाळा, ता. जाफ्राबाद, जि. जालना.
(संस्थाचालक - दुर्गेश नवले)(मयत)
16)जिजामाता ग्रामिण विकास व शिक्षण संस्था जाफ्रबाद ता. जाफ्राबाद, जि. जालना संचलित जिजाऊ इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद, ता.जाफ्राबाद, जि. जालना.
(संस्थाचालक - सुरेखाताई लहाने)- माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी SP)
17)विश्वशांती शिक्षण प्रसारक मंडळ जाफ्राबाद, जि. जालना. संचलित मॉडर्न इंग्लीश स्कुल, जाफ्राबाद, ता. जाफ्राबाद, जि. जालना.
(संस्थाचालक - सुरेश दिवटे)
18)विश्वशांती शिक्षण प्रसारक मंडळ, जाफ्राबाद संचलित ज्ञानसागर इंग्लिश स्कुल, सिपोरा (अ), ता. जाफ्राबाद, जि. जालना.
(संस्थाचालक - सुरेश दिवटे)
19)जिजामाता महिला विकास व शिक्षण संस्था जाफ्राबाद, ता. जाफ्राबाद, जि. जालना संचलित राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, ता. जाफ्राबाद, जि. जालना.
(संस्थाचालक- सुरेखाताई लहाने, माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी SP)
20)श्री. गजानन बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, नजिक पांगरी संचलित गोल्ड मेडल इंग्लीश स्कुल, जालना.
(संस्थाचालक--गजानन वाळके.)
ही बातमी वाचा: