नागपूर : केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या (State Government) निर्देशानुसार कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशातील 18 वर्षावरील सर्व वयस्क नागरिकांना कोरोनाच्या प्रतिबंधक लसीची वर्धित मात्रा (बुस्टर डोज) 15 जुलै पासून मोफत देण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षात केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. नागपूर महानगरपालिका तर्फे सुद्धा शुक्रवार पासून पात्र नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस (Booster dose) मोफत दिली जाईल. ही माहिती मनपा आयुक्त आणि प्रशासक (NMC Commisioner) राधाकृष्णन बी यांनी दिली. त्यांनी सांगितले कि कोरोनाची दुसरी लस घेतल्याच्या सहा महिन्यांनंतर कोरोनाची ही अतिरिक्त लस घेता येणार आहे. या आधी हा कालावधी नऊ महिन्याचा होता. तो कमी करत सरकारने सहा महिन्यांवर आणला आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे.
15 जुलैपासून शहरातील 18 वर्षावरील सर्वांना ही लस मोफत दिली जाईल. हे अभियान 15 जुलैपासून 30 सप्टेंबर पर्यंत (75 दिवस) चालणार आहे. या अभियानाचा देशातील 18 ते 59 या वयोगटातील लोकांना याचा फायदा मिळणार आहे. नागपूर मनपा (NMC) आणि शासकीय केंद्रांवर लस मोफत दिली जाणार आहे. कोव्हीशिल्ड लस (Covishiled) सोमवार ते शनिवार सर्व केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच 12 ते 14 वर्ष वयोगातील मुलांना कर्बोव्हॅक्स लस शनिवारी दिली जाईल. कोव्हॅक्सीन लस सोमवार ते शुक्रवार 8 केंद्रांवर उपलब्ध राहील. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र मध्ये फक्त कोव्हॅक्सीन सोमवार ते शनिवार उपलब्ध राहील. 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची अतिरिक्त लस आधीपासूनच मोफत मिळत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य कर्मचारी आणि कोरोना आघाडीवरचे योध्दे यांनाही ही लस मोफत मिळत आहे.
मनपाच्या या केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस सोमवार ते शनिवार उपलब्ध
झोन क्र. 1 लक्ष्मीनगर झोन
• कामगार नगर यूपीएचसी, कामगार कॉलनी, सुभाष नगर
• जयताळा यूपीएचसी, जयताळा
• खामला यूपीएचसी, खामला नागपूर
झोन क्र. 2 धरमपेठ झोन
• फुटाळा यूपीएचसी,अमरावती रोड, गल्ली क्र. 3
• सदर रोग निदान केन्द्र, रेसिडेन्सी रोड, सदर
• सुदाम नगर यूपीएचसी, पांढराबोडी हिल टॉप
• के.टी. नगर यूपीएचसी, के.टी.नगर (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
• हजारी पहाड यूपीएचसी, हजारीपहाड
• डिक दवाखाना, व्हीआयपी रोड, धरमपेठ (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
• इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
झोन क्र. 3 हनुमाननगर झोन
• मानेवाडा यूपीएचसी, शाहू नगर
• नरसाळा यूपीएचसी, नरसाळा
• हुडकेश्वर यूपीएचसी, हुडकेश्वर
झोन क्र. 4 धंतोली झोन
• GMC शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये फक्त कोव्हॅक्सीन
• बाबुलखेडा यूपीएचसी, मानवता हायस्कूल जवळ
• आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
• एम्स हॉस्पीटल, मिहान, नागपूर (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
झोन क्र. 5 नेहरूनगर झोन
• बिडीपेठ युपीएचसी, बिडीपेठ
• ताजबाग यूपीएचसी, बडा ताज बाग
• नंदनवन यूपीएचसी, दर्शन कॉलनी
• दिघोरी यूपीएचसी, जिजामाता नगर
झोन क्र. 6 गांधीबाग झोन
• महाल रोग निदान केंद्र, महाल (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
• भालदारपुरा युपीएचसी, बजेरिया
• मोमिनपूरा यूपीएचसी, मोमिनपूरा
झोन क्र. 7 सतरंजीपुरा झोन
• मेहंदीबाग यूपीएचसी, मेहंदीबाग
• कुंदनलाल गुप्ता यूपीएचसी, मनपा शाळेजवळ
• जगनाथ बुधवारी युपीएचसी, गोळीबार चौक
• शांती नगर यूपीएचसी, शांती नगर
• सतरंजीपूरा यूपीएचसी
झोन क्र. 8 लकडगंज झोन
• डिप्टी सिग्नल युपीएचसी, संजय नगर, डिप्टी सिग्नल
• पारडी युपीएचसी, पारडी
• भरतवाडा युपीएचसी, विजय नगर, भरतवाडा
• हिवरी नगर युपीएचसी, हिवरी नगर
झोन क्र. 9 आशीनगर झोन
• पाचपावली युपीएचसी लष्करीबाग, आवळेबाबु चौक
• कपिल नगर यूपीएचसी, कपिल नगर
• शेंडे नगर युपीएचसी, शेंडे नगर
• बंदे नवाज युपीएचसी
• गरिब नवाज युपीएचसी
• आंबेडकर हॉस्पीटल, कामठी रोड येथे फक्त कोव्हॅक्सीन
झोन क्र. 10 मंगळवारी झोन
• गोरेवाडा यूपीएचसी, गोरेवाडा वस्ती
• झिंगाबाई टाकळी यूपीएचसी, झिंगाबाई टाकळी जुनी वस्ती
• इंदोरा यूपीएचसी, बेझनबाग
• नारा यूपीएचसी, नारा