नागपूरः 'अग्निपथ' लष्करभरती योजनेच्या विरोधात दिल्लीसह उत्तर भारतात सुरु असलेल्या आंदोलनांचा फटका नागपूर मार्गे जाणाऱ्या 15 रेल्वे गाड्यांना बसला आहे. आंदोलकांनी लक्ष केल्यामुळे देशातील अनेक रेल्वेगाड्या रद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, कुठलीही अनुचित घटना होऊ म्हणून रेल्वेस्थानकासह इतरही ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला. जीआरपी आणि आरपीएफ यांनी संयुक्तरित्या स्थानकावर रूट मार्च काढला.
अग्निपथ विरोधात देशभर पेटलेला आंदोलनाचा वणवा कमी होण्याचे नाव नाही. उत्तरेतून सुरू झालेल्या या आंदोलनाचे लोण दक्षिणेतही पोहोचले आहे. आंदोलकांनी गाड्यांना टार्गेट केल्यामुळे रेल्वे प्रशासनाने देशातील अनेक रेल्वेगाड्या रद्द केल्या. त्यापैकी नागपूर मार्गे धावणाऱ्या 15 गाड्यांचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे.
जीआरपी-आरपीएफचा रूट मार्च
लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सकाळी मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर रूट मार्च करून बंदोबस्त दिवसभरासाठी कायम ठेवला. मनिषनगर, काटोल, नरखेड, अजनी, सी-केबिन, डी-केबिन तसेच मुंबई, दिल्ली मार्गावर लोहमार्ग पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठांच्या पुढील आदेशापर्यंत हा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
या गाड्या रद्ध
रद्ध गाड्यांमध्ये 12807/12808 विशाखापट्टणम-निजामुद्दीन व निजामुद्दीन-विशाखापट्टणम, 12295 संघमित्रा एक्स्प्रेस, 22352 पाटलीपूत्र सुपरफास्ट एक्स्प्रेस, 12522 बुराणी राप्ती सागर एक्स्प्रेस, 12578 बागमती एक्स्प्रेस, 12792 सिकंदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस, 22644 एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेस, 22354 पटणा हमसफर एक्स्प्रेस, 12389 एमजीआर चेन्नई सेंट्रल विकली सुपरफास्ट एक्स्प्रेस, 17008 सिकंदराबाद एक्स्प्रेस, 12811 हटीया सुपरफास्ट एक्स्प्रेस, 12670 गंगा कावेरी एक्स्प्रेस, 12995 अजमेर सुपरफास्ट एक्स्प्रेस, 6509 सिकंदराबाद-दानापूर हमसफर एक्स्प्रेस, 12521 एर्नाकुलम राप्ती सादर एक्स्प्रेसचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या