नागपूरः सोमवारी कमी चाचण्या झाल्याने कोरोना बाधितांच्या संख्येत घट दिसून आली होती. मात्र मंगळवारी पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडली असून दिवसभरात शहरात 135 नवे कोरोबाबाधित आढळून आले. यात शहरातील 82 तर ग्रामीणमधील 53 बाधितांचा समावेश आहे. एका दिवसात मोठी बाधित संख्या आल्याने प्रशासनाचेही धाबे दणाणले आहे.
मंगळवारी 65 जणांना कोरोनावर मात केली. यात शहरातील 45 तर ग्रामीण भागातील 20 बाधितांचा समावेश होता. सध्या सद्यस्थितीत ग्रामीणमध्ये 183 तर शहरात 398 असे एकूण 581 कोरोना बाधित सक्रीय आहेत. आज जिल्ह्यात 1556 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात 343 चाचण्या ग्रामीणमध्ये तर 1213 चाचण्या शहरात करण्यात आल्या.
15 रुग्ण रुग्णालयात भरती
एकूण कोरोनाबाधितांपैकी 15 रुग्णांना उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्यात 8 रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालय, 1 रुग्ण मेयो, 1 रुग्ण किंग्सवे हॉस्पिटल, 1 रुग्ण सनफ्लावर हॉस्पिटल, 2 रुग्ण ऑरेंजसिटी हॉस्पिटल तर 3 रग्ण मेडीट्रिना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तर 566 रुग्ण गृहविलीकरणात आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या