मुंबई : राज्यात आज 3098 कोरोनाच्या (Corona) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 4207 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सध्या 659 सक्रिय रुग्ण (Active Patient) आहेत.
सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज सहा कोरोनाबाधित (Corona Death) रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,21, 140 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.89 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात आज एकूण 20, 820 सक्रिय रुग्ण
राज्यात आज एकूण 20,820 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 6409 इतके रुग्ण असून त्यानंतर पुण्यात 4037 सक्रिय रुग्ण आहेत.
देशातील नवीन कोरोना रुग्णांमध्ये घट
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. सोमवारी दिवसभरात देशात 13 हजार 086 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 24 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारताता आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच लाखांच्या पुढे पोहोचली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्याही एक लाखाच्या पुढे गेली आहे. रविवारच्या तुलनेनं सोमवारी नोंद झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. रविवारी देशात 16 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. सोमवारी 13 हजार 086 नवे कोरोना रुग्ण आढळले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन आकडेवारी जारी केली आहे. यानुसार देशात मागील 24 तासांत 12 हजार 456 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यास देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 28 लाख 91 हजार 933 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. दरम्यान देशात आतापर्यंत 5 लाख 25 हजार 223 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.