एक्स्प्लोर

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या दहा रंजक गोष्टी!

भारताचा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्टलाच का असतो? जवाहरलाल नेहरु यांनी भाषण दिलं, त्यावेळी गांधीजी कुठे होते? यासह स्वातंत्र्याबाबतच्या रंजक गोष्टी जाणून घेऊया

मुंबई : भारत उद्या म्हणजेच 15 ऑगस्टला 72वा स्वतंत्र्यदिन साजरा करणार आहे. 15 ऑगस्ट, 1947 भारतीय इतिहासातील ती तारीख आहे, जेव्हा आपला देश ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला होता. भारताचा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्टलाच का असतो? जवाहरलाल नेहरु यांनी भाषण दिलं, त्यावेळी गांधीजी कुठे होते? यासह स्वातंत्र्याबाबतच्या रंजक गोष्टी जाणून घेऊया भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित दहा रंजक गोष्टी 1. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्त्व महात्मा गांधी यांनी केलं होतं. पण 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा ते या जल्लोषात सहभागी झाले नव्हते. भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवशी महात्मा गांधी दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या बंगालच्या नोआखलीमध्ये होते. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये सुरु असलेला धार्मिक हिंसाचार रोखण्यासाठी ते उपोषण करत होते. 2. 15 ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र होणार हे निश्चित झालं, त्यावेळी जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी महात्मा गांधींना पत्र लिहिलं. या पत्रात लिहिलं होतं की, "15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन असेल. तुम्ही राष्ट्रपिता आहात. यात सहभागी व्हा आणि आशीर्वाद द्या." 3. गांधी यांनी या पत्राचं उत्तर असं पाठवलं की, "कलकत्त्यामध्ये हिंदू-मुस्लिम एकमेकांचा जीव घेत असताना मी जल्लोष साजरा करण्यासाठी कसा येऊ शकतो? दंगल रोखण्यासाठी मी माझे प्राण देईन." 4. जवाहरलाल नेहरु यांनी ऐतिहासिक भाषण अर्थात 'ट्रिस्ट विथ डेस्टनी' 14 ऑगस्टच्या मध्यरात्री व्हॉईसराय लॉजमधून (सध्याचं राष्ट्रपती भवन) दिलं होतं. तेव्हा नेहरु पंतप्रधान बनले नव्हते. हे भाषण संपूर्ण जगाने ऐकलं, पण गांधीजी त्या दिवशी नऊ वाजताच झोपले होते. 5. 15 ऑगस्ट, 1947 रोजी लॉर्ड माऊंटबॅटन यांनी त्यांच्या कार्यालयात काम केलं. दुपारी नेहरुंनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळाची यादी सोपवली आणि त्यानंतर इंडिया गेटजवळ प्रिन्सेस गार्डनमध्ये एक सभेला संबोधित केलं. 6. प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. पण 15 ऑगस्ट 1947 रोजी असं झालं नव्हतं. लोकसभा सचिवालयाच्या एका पत्रानुसार, "नेहरुंनी 16 ऑगस्ट, 1947 रोजी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला होता." 7. भारताचे तत्कालीन व्हॉईसराय लॉर्ड माऊंटबॅटन यांचे माध्यम सचिव कॅम्पबेल जॉनसन यांच्या माहितीनुसार, "जपानच्या शरणागतीची दुसरं वर्ष 15 ऑगस्टला होणार होतं. त्याच दिवशी भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय झाला." 8. 15 ऑगस्टपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमारेषा निश्चित झाली नव्हता. याचा निर्णय 17 ऑगस्ट रोजी रेडक्लिफ लाईनच्या घोषणेद्वारे झाला. 9. भारत 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाला खरा, पण देशाचं स्वत:चं राष्ट्रगीत बनलं नव्हतं. रविंद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्येच 'जन-गण-मन' लिहिलं होतं, परंतु 1950 मध्ये त्याची राष्ट्रगीत म्हणून अधिकृत निवड झाली. 10. 15 ऑगस्त हा भारतासह इतर तीन देशांचाही स्वातंत्र्यदिन आहे. दक्षिण कोरिया जापानपासून 15 ऑगस्ट, 1945 रोजी स्वतंत्र झाला होता. ब्रिटनपासून बहारीन 15 ऑगस्ट, 1971 रोजी आणि फ्रान्सपासून कांगो 15 ऑगस्ट, 1960 मध्ये स्वतंत्र झाला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
Embed widget