मायनस 3 डिग्री तापमानात हिमाचलमध्ये शुटिंग करतायेत बिग बी; ट्वीट करत सांगितला अनुभव
एबीपी माझा वेब टीम | 14 Dec 2019 12:30 PM (IST)
सुपरस्टार अमिताभ बच्चन सध्या मायनस 3 डिग्री तापमानात हिमाचलमध्ये शुटिंग करत आहेत. याचाच अनुभव त्यांनी हटके स्टाइलमध्ये ट्वीट करत शायरीमार्फत सांगितला आहे.
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या दिवसांत हिमाचलमध्ये आपला आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'च्या शुटिंगमध्ये बीझी आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन सध्या मायनस 3 डिग्री तापमानात हिमाचलमध्ये शुटिंग करत आहेत. याच कारणामुळे हिमाचलमध्ये वाढत्या थंडीमुळे अमिताभ बच्चनने एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये अमिताभ यांनी लिहिलं आहे की, 'येती येती येती, ये सर्दी सर पे बीती तन ढका , अंग ढका , ढका पूर्ण शरीर मन को ढकने से बाज रहे , यही है तकरीर' आगामी काळात अमिताभ बच्चन आपल्या चार चित्रपटांसह बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांच्या यादीत, 'चेहरे', 'ब्रह्मास्त्र', 'झुंड' आणि 'गुलाबो-सिताबो' या चित्रपटांचा समावेश आहे. 'चेहरे'मध्ये अमिताभ बच्चन इमरान हाशमीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'ब्रह्मास्त्र'मध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सुपरस्टार अमिताभ यांच्यासोबत दिसणार आहेत. अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये चर्चेत असेला अभिनेता आयुष्मान खुरानसोबत गुलाबो-सिताबोमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अनेकदा अमिताभ बच्चन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळते. ते अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींवर व्यक्त होत असतात. दरम्यान, बिग बी अमिताभ बच्चन सध्या आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपला एक क्लासी फोटो शेअर करत फॅन्सना सांगितले होते की, ते मनालीमध्ये असून क्लायमॅक्स शुटिंग करत आहेत. बिग बींसोबत रणबीर कपूर आणि आलिया भट्टही उपस्थित आहेत. अमिताभ बच्चान यांनी शेअर केलेल्या फोटोवर त्यांची मुलगी श्वेता नंदा हिने एका स्माइलीसोबत 'डॅडी कूल' अशी कमेंट केली आहे. तर फॅन्सनी त्यांच्या फोटोवर काळजी घेण्यास सांगितले होते. संबंधित बातम्या : 2019मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेले चित्रपट सारा अली खानने अभिनेत्री रेखाबाबत लिहिली अशी गोष्ट; सोशल मीडियावर व्हायरल झाली पोस्ट Tanhaji I 'तान्हाजी' चित्रपटातील 'त्या' दृश्यावर मालुसरे यांच्या वंशजांचा आक्षेप दीपिका पादुकोणचा फोटो पाहून रणवीर म्हणाला, 'मार दो मुझे'