मुंबई : सध्या 2019 यावर्षाचा शेवटचा महिना सुरू आहे. यावर्षी बॉक्स ऑफिसवर वेगवेगळ्या कथानकांवर आधारीत असणाऱ्या चित्रपटांनी धुमाकूळ घातला. ज्या चित्रपटांना प्रेक्षकांनीही पसंती दर्शवली. 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' पासून 'एवेंजर्स एन्डगेम' पर्यंत विविध चित्रपटांनी हे वर्ष चक्क गाजवलं. सध्या गुगल ट्रेन्ड संपूर्ण देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रांत गाजलेल्या ट्रेन्ड्सची यादी जाहीर केली आहे. जाणून घेऊया 2019मध्ये गुगलवर कोणते चित्रपट सर्वात जास्त सर्च करण्यात आले...


कबीर सिंह : शाहीद कपूर आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट कबीर सिंह बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. चित्रपटातील गाणीही फार हिट झाली. प्रदर्शित झाल्यानंतर कबीर सिंहने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट संदीप रेड्डी यांचा तेलगू चित्रपट अर्जुन रेड्डी चा रिमेक होती.


एवेंजर्स एन्डगेम : एवेंजर्स एन्डगेम यंदाच्या वर्षातील जगभरात सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट आहे. भारतातही या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. 'एवेंजर्स एन्डगेम' हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सुपरहिरो चित्रपट होता.


जोकर : वाकीन फीनिक्स स्टारर जोकरही भारतासह संपूर्ण जगभरात गाजला. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला.

कॅप्टन मार्वेल : एक स्टँडअलोन सुपरहिरो वुमन फिल्म कॅप्टन मार्वेलवर करण्यात आलेला प्रयत्न यशस्वी झाला. मार्वेल्सचा प्रयत्न होता की, त्यांना जग वाचवण्याऱ्या एका महिलेवर चित्रपट बनवायचा होता. यासाठी त्यांना दहा वर्ष लागली.


सुपर 30 : ऋतिक रोशन स्टारर फिल्म सुपर 30 ने यंदा बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली. एज्युकेशनवर आधारित रीअल बेस्ड फिल्म लोकांना प्रचंड आवडली.


मिशन मंगल : अक्षय कुमार अभिनित मिशन मंगल चित्रपटालाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. भारताच्या मार्स ऑर्बिटर मिशनवर आधारीत असलेल्या या चित्रपटात विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कीर्ति कुल्हारी, निथ्या मेनन आणि शरमन जोशी यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश होता.


वॉर : ऋतिक रोशन आणि टाइगर श्रॉफ स्टारर वॉर हा चित्रपट यावर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. कारण हिंदी चित्रपटांतील सर्वात लोकप्रिय अॅक्शन हिरोंचा या चित्रपटामध्ये समावेश होता.


उरी सर्जिकल स्ट्राइक : विक्की कौशलला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत होता. प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला. पहिल्यांदा आदित्य धर द्वारे दिग्दर्शित या चित्रपटाला चार राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.

संबंधित बातम्या :

मार्वेल सिरीजमधील 'ब्लॅक विडो'चा ट्रेलर रिलीज; हॉलीवूड सुपरस्टार स्कार्लेट जोहानसन मुख्य भूमिकेत

'पानिपत'साठी असे तयार झाले 'सदाशिव राव' आणि 'अहमद शाह अब्दाली'

रणवीर सिंहचा गुजराती अंदाज; 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक रिलीज