मुंबई : केदारनाथमधून बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी सारा अली खानने फार कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. त्यानंतर तिने 'सिंम्बा'मध्ये अभिनेता रणवीर सिंहसोबत स्क्रिन शेअर केली. साराच्या फॉलोअर्समध्येही वाढ झाल्याचे पाहायला मिळते. सारा इंस्टाग्रामवरही अ‍ॅक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळते. ती आपले लेटेस्ट फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. साराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक लेटेस्ट फोटो पोस्ट केला आहे. जो सध्या व्हायरल होत आहे.

साराने आपले फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये एक शायरी लिहिली आहे. ज्यामध्ये तिने बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखाचा उल्लेख केला आहे. तिची शायरी फॅन्सना फार आवडल्याचे पाहायला मिळत आहे. एवढचं नव्हे तर फॅन्स तिच्या शायरीवर अनेक कमेट्स करत आहेत.


सारा अली खानने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत एक कॅप्शन दिलं आहे. ज्यामध्ये ती म्हणाली, 'इन आंखों की मस्ती, रेखा जी से है सारा बहुत सस्ती, लकीली वो अपने आप में है हस्ती, वह खुद ही यह सारी बातें है करती और वो फस्ती'. यासोबतच तिने पुढे एक हॅशटॅगही दिला आहे. ज्यामध्ये तिने #sarakishayari असं लिहिलं आहे. साराचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. साराचे फॅन्स तिच्या या फोटोवर कमेंट करून तिचा फोटो आणि शायरीचं फार कौतुक करत आहेत. त्यांच्या या फोटोवर लाखो लाईक्स आले आहेत, या फोटोमध्ये सारा अली खान फार सुंदर दिसत आहे.

सारा अली खान इंस्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह असून 15.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. सारा अली खान लवकरच कार्तिक आर्यन सोबत आगामी चित्रपट 'आज कल' मध्ये दिसून येणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट 'लव आज कल'चा सीक्वल असणार आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी म्हणजेच, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या : 

2019मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेले चित्रपट

दीपिका पादुकोणचा फोटो पाहून रणवीर म्हणाला, 'मार दो मुझे'

रणवीर सिंहचा गुजराती अंदाज; 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक रिलीज

मार्वेल सिरीजमधील 'ब्लॅक विडो'चा ट्रेलर रिलीज; हॉलीवूड सुपरस्टार स्कार्लेट जोहानसन मुख्य भूमिकेत