मुंबई : सलमान खानचा बुहुचर्चित चित्रपट 'दबंग 3'मधील 'मुन्ना बदनाम हुआ' या गाण्याचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. तेव्हापासून लोक या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. शनिवारी रात्री हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. यागाण्याआधी 'दबंग 3' चित्रपटातील सहा गाणी प्रदर्शित करण्यात आली होती. 'दबंग' सिरिजमधील पहिल्या दोन चित्रपटांमधील आयटम सॉन्ग 'मुन्नी बदनाम' आणि 'फेविकोल से' ही दोन्ही गाणी प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजली होती.

काही दिवसांपूर्वी सलमान खानने इन्स्टाग्रामवर या गाण्याची खास झलक शेअर केली होती. आता हे गाणं रिलीज करण्यात आलं असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. 'दबंग 3' चित्रपटाचा ट्रेलर याआधीच रिलीज करण्यात आला असून लोकांनी पसंतीही दर्शवली आहे.


'दबंग 3' मधील 'मुन्ना बदनाम हुआ' या गाण्यात सलमान खानसोबत वरीना हुसैन दिसून येत आहे. याव्यतिरिक्त चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभुदेवाही या गाण्यात दिसून येत आहेत. या गाण्यातील स्टेप्ससोबतच सलमान, वरीना आणि प्रभुदेवा यांचे ड्रेसही चर्चेचा विषय ठरले आहेत. याआधी सलमान खानचा चित्रपट 'वॉन्टेड' मधील 'मेरा ही जलवा' या गाण्यातही अभिनेता प्रभुदेवा दिसून आला होता. या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन वैभवी मर्चेंटने केलं आहे.

पाहा धमाकेदार गाण्याचा व्हिडीओ : 



'मुन्ना बदनाम हुआ' बादशाह, कमाल खान आणि ममता शर्माने गायलं आहे. गाण्यासाठी म्युझिक साजिद-वाजिद यांनी दिलं आहे. तसेच गाण्याचे लिरिक्स दानिश सबरी आणि बादशाह यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. 'दबंग 3' 20 डिसेंबर रोजी रिलिज होणार आहे.

पाहा चित्रपटाचा ट्रेलर :



दरम्यान, या चित्रपटात सलमान खान आणि सई मांजरेकर व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान आणि माही गिल हे सेलिब्रिटी दिसून येणार आहेत. यामध्ये खलनायक म्हणून साउथचे स्टार किच्चा सुदीप दिसून येणार आहेत. चित्रपट 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या : 

'पहिला वार लाखमोलाचा'; 'तानाजी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Jayalalitha Biopic I 'थलाइवी'चा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित; जयललितांच्या भूमिकेत कंगना

राणी मुखर्जीने रणवीर सिंहचा लूक केला कॉपी; व्हायरल होत आहेत फोटो

Panipat Trailer | जबरदस्त अॅक्शनने भरलेला 'पानिपत'चा ट्रेलर प्रदर्शित