Zara Hatke Zara Bachke Review : गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या कथानकावर भाष्य करणारे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमांतील नव्या गोड्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. आता 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमाच्या माध्यमातून अशीच एक नवीकोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'जरा हटके जरा बचके' या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) मुख्य भूमिकेत आहेत. 


लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. निर्माते दिनेश विजान छोट्या शहरांतील मध्यमवर्गीयांची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. आता 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाच्या माध्यमातून ते अशीच एक भन्नाट गोष्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 


'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचं कथानक काय आहे? (Zara Hatke Zara Bachke Movie Story)


'जरा हटके जरा बचके' या सिनेमाची गोष्ट इंदूरमध्ये राहणाऱ्या कपिल दुबे (विकी कौशल) आणि सौम्या दुबेची (सारा अली खान) आहे. सौम्या आपल्या आई-वडिलांसोबत एका छोट्या खेड्यातील छोट्या घरात लहानाची मोठी झालेली मुलगी आहे. एका कोचिंक क्लासमध्ये ती विद्यार्थ्यांना शिकवते. तर दुसरीकडे कपिल योगा शिकवतो. 


कपिल आणि सौम्या पती-पत्नी असून अनेक अडचणींचा सामना करत ते आयुष्य जगत आहे. एका छोट्या घरात त्यांनी त्यांच्या संसाराची सुरुवात केली आहे. दरम्यान त्यांच्या घरी कपिलचे मामा-मामी येतात. आता घरात अचानक पाहुणे आल्यामुळे नव्या जोडप्याला एकत्र वेळ घालवणं अशक्य होत आहे. पुढे त्यांच्या नात्यात दुरावा येतो आणि मग तेच घटस्फोटाचं कारण ठरते. कपिल आणि सौम्यामध्ये नक्की काय झालं हे प्रेक्षकांना सिनेमा पाहिल्यावर कळेल. 


'जरा हटके जरा बचके' या सिनेमातील विकी कौशलचा सटल अभिनय आणि सिनेमाचं कथानक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारं आहे. 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचं कथानक कुठेतरी खरं असल्याचं, आपल्या अवती-भोवती फिरणारं असल्याचं सिनेमा पाहताना जाणवतं. स्वत:चं, हक्काचं घर असणं खूप गरजेचं आहे, हे सांगणारा हा सिनेमा आहे. 


'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा एकंदरीतच मनोरंजनात्मक आहे. या सिनेमाचं कथानक प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवणारं आहे. 'जरा हटके जरा बचके' या सिनेमातील प्रत्येक फ्रेममध्ये विकीला काहीतरी सांगायचं आहे हे जाणवतं. तर दुसरीकडे साराने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. 


'जरा हटके जरा बचके' या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी आहेत. गाण्यांसोबतच सिनेमाचं कथानक पुढे सरकताना दिसून येतं. मध्यमवर्गीय कुटुंबियांची गोष्ट योग्यपद्धतीने मांडणारा 'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा आहे.