India Richest Actress: भारतामधील अभिनेत्री या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यास त्यांचे चाहते उत्सुक असतात. भारतातील टॉप-10  श्रीमंत अभिनेत्री कोण आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घेऊयात भारतातील श्रीमंत अभिनेत्रींच्या संपत्तीबाबत...


ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)


एका रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय बच्चन ही भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.  तिची एकूण संपत्ती जवळपास  828 कोटी रुपये आहे. ऐश्वर्या इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती एका चित्रपटासाठी सुमारे 10 कोटी रुपये मानधन घेते. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याचा पोन्नियिन सेल्वन-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वा बघत आहेत. 


प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)


भारतातील श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत प्रियांका चोप्राचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे प्रियंका चोप्रा जोनासची एकूण संपत्ती जवळपास अंदाजे 580 कोटी रुपये आहे. प्रियांकाची  न्यूयॉर्कमधील रेस्टॉरंटसह इतर व्यवसायातही गुंतवणूक आहे. प्रियांका ही ग्लोबल स्टार आहे. तिनं बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.


आलिया भट्ट (Alia Bhatt)


आलिया भट्टची एकूण संपत्ती जवळपास 557 कोटी रुपये आहे.  काही महिन्यांपूर्वी ब्रह्मास्त्र या चित्रपटामधून आलिया प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.  लवकरच तिचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


करीना कपूर खान (Kareena Kapoor)


करीना कपूर खान ही  भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. एका रिपोर्टनुसार,  तिची एकूण संपत्ती सुमारे 440 कोटी रुपये आहे.  


दीपिका पदुकोण (Deepika Padukone)


दीपिका पदुकोणची एकूण संपत्ती जवळपास 314 कोटी रुपये आहे. तिने अनेक स्टार्टअप्स आणि ब्रँड्समध्ये गुंतवणूक केली आहे. दीपिकाच्या काही महिन्यांपूर्वी रिवीज झालेल्या पठाण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता प्रेक्षक तिच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत. 


अनुष्का शर्मा (Anushka Sharma)



अनुष्का शर्माची एकूण संपत्ती अंदाजे 255 कोटी रुपये आहे. अनुष्का शर्मा सुद्धा नुश या कपड्यांच्या ब्रँडची मालकीण आहे आणि तिचे बाजार मूल्य सुमारे 65 कोटी रुपये आहे.


माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)



माधुरी दीक्षित ही भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे तिची एकूण संपत्ती जवळपास 248 कोटी रुपये आहे.


कतरिना कैफ (Katrina Kaif)


कतरिना कैफची एकूण संपत्ती 217 कोटी रुपये आहे.


समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)


समंथा रुथ प्रभूची एकूण संपत्ती 89 कोटी रुपये आहे. समंथा ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 


नयनतारा (Nayanthara)


नयनतारा ही भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिची अंदाजे एकूण संपत्ती 165 कोटी रुपये आहे.


अनुष्का शेट्टी (Anushka Shetty)


रिपोर्ट्सनुसार, बाहुबली स्टार अनुष्का शेट्टीची एकूण संपत्ती 120 कोटी रुपये आहे.


संबंधित बातम्या


Entertainment News Live Updates 02 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!