Farzi Web Series Review : सरकारने 2016 साली नोटबंदीची (Notebandi) घोषणा केली होती. त्याअंतर्गत 1,000 रुपयाच्या नोटा बंद करण्यात आल्या आणि 500 आणि 2,000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या. काळ्या पैशांवर नियंत्रण ठेवता यावं हा यामागचा उद्देश होता. बनावट नोटा छापल्या जाऊ नयेत यासाठी सरकारने नव्या नोटांवर खूप काम केलं. पण आजही बनावट नोटा छापणाऱ्या व्यवसायाला नष्ट करण्यात सरकारला यश आलेलं नाही. 


अॅमेझॉन प्राइमवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फर्जी' (Farzi) या वेबसीरिजमध्येदेखील काळा पैसा, बनावट नोटा, राजकारणी मंडळींची विचारसरणी, आर्थिक विषमता अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच या वेबसीरिजमध्ये बनावट नोटा छापणारा व्यवसाय जवळून दाखवण्यात आला आहे. 


'फर्जी' या वेबसीरिजच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने (Shahid Kapoor) ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. या वेबसीरिजमध्ये शाहिद कपूर म्हणजेच सनी केंद्रस्थानी आहे. बनावट नोटांच्या व्यवसायाचा सनी कसा भाग बनतो हे पाहण्याजोगं आहे. पुढे त्याच्याकडे असलेल्या एका खास कौशल्यामुळे तो या व्यवसायाचा एक महत्त्वाचा भाग बनतो. शाहिद कपूरसह दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीनेदेखील (Vijay Sethupathi) 'फर्जी'च्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. तर राशी खन्नाचीदेखील ही दुसरीच सीरिज आहे. 


गुन्हेगारीवर बेतलेले अनेक सिनेमे आणि वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. हे सिनेमे आणि वेबसीरिज गुन्हे, दहशतवाद, हेरगिरी आणि राजकीय भष्ट्राचार यांच्याभोवती फिरतात. त्यामुळे 'फर्जी' ही वेबसीरिज गुन्हेगारीवर भाष्य करणारी असली तरी या सगळ्यांपेक्षा उजवी ठरते. या वेबसीरिजच्या माध्यमातून जुना विषय नव्याने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नाविन्याता असल्याने ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. एक थरार नाट्य या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. कथा, पटकथा, संवाद आणि कलाकरांच्या अभिनयाच्या जोरावर या वेबसीरिज ओटीटी विश्वात स्वत:ची एक वेगळी जागा निर्माण केली आहे.


'फर्जी' या वेबसीरिजचं कथानक काय? (Farzi Web Series Story)


बनावट नोटांच्या व्यवसायात अडकलेल्या एका कलाकाराची कहाणी 'फर्जी' या वेबसीरिजमध्ये मांडण्यात आली आहे. या सीरिजमध्ये शाहिद कपूर म्हणजेच सनी चित्रकाराच्या भूमिकेत आहे. त्याचं बालपण हे त्याच्या आजोळी गेलं आहे. आजोबांनी त्याचा सांभाळ केला आहे. आई-वडिलांनी वाऱ्यावर सोडल्यानंतर त्याच्या आजोबांनी त्याचा लहानाचं मोठं केलं आहे. 


सनीचे आजोबा 'क्रांती पत्रिका' या मुखपत्रिकेचे संपादक होते. पण कर्जामुळे आजोबांनी प्रेस अडचणीत येते. त्यावेळी सनी त्याच्या कलेचा वापर करत खोट्या नोटा बनवायला सुरुवात करतो. खोट्या नोटा बनवायचा सनीचा हा प्रवास कुठे जाऊन थांबतो हे प्रेक्षकांना सीरिजमध्ये पाहायला मिळेल. काउंटफिर करन्सी हा प्रकारदेखील या सीरिजमध्ये उलगडण्यात आला आहे. 


संबंधित बातम्या


Farzi Trailer Out: शाहिद अन् विजय सेतूपतीच्या 'फर्जी'चा ट्रेलर रिलीज; या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन वेब सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीस