The Kerala Story Review : केरळमधील (Kerala) मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना आयएसआयएसमध्ये (ISIS) सामील केलं जात आहे. बेपत्ता झालेल्या मुलींचा आकडा नक्की किती आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाचं कथानक खरं असल्याचं काहींचं मत आहे. तर काही मंडळी मात्र हा सिनेमा प्रपोगंडा असल्याचं म्हणत आहे. तर जाणून घ्या 'द केरळ स्टोरी'चा रिव्ह्यू...
'द केरळ स्टोरी' या सिनेमाचं कथानक काय? (The Kerala Story)
'द केरळ स्टोरी' या सिनेमाचं कथानक नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या शालिनी उन्नीकृष्णनवर आधारित आहे. शालिनी आणि तिच्या मैत्रिणींना मुस्लिम मुलं प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. पुढे ते या मुलींची फसवणूक करतात. मुलगी गरोदर असल्याचं कळल्यानंतर ते तिला सोडून देतात. मुलीच्या चुकीमुळे घरच्यांना एका वेगळ्या संघर्षाचा सामना करावा लागतो. आलेल्या अडचणींचा ते कसा सामना करतात हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे.
'द केरळ स्टोरी' या सिनेमाची बांधणी खूपच चांगल्याप्रकारे करण्यात आली आहे. या सिनेमातील प्रत्येक सीन तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. महिलांचे ब्रेनवॉश करुन त्यांचे धर्मांतर करण्यासंदर्भातला संवाद सुरू होतो तेव्हा सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात. या सिनेमातील प्रत्येक फ्रेम तुम्हाला खिळवून ठेवते. मुलींची फसवणूक झाल्यानंतर सिनेप्रेक्षकाला अश्रू अनावर होतात. त्यामुळे मनोरंजन करण्यासोबत प्रेक्षकांना जागं करण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या शेवटी काही गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. यात स्वत:च्या अस्तिस्वासाठी लढणाऱ्या मुलींच्या मुलाखतीदेखील दाखवण्यात आल्या आहेत. पण काही मुलींचे व्हिडीओ दाखवण्यात आले आहेत आणि 32,000 मुली बेपत्ता झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता सत्य काय आहे हे निर्मात्यांनाच ठाऊक.
'द केरळ स्टोरी'च्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय
'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मा (Adah Sharma) शालिनी उन्नीकृष्णनच्या भूमिकेत दिसत आहे. तिचा ताकदीच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. अभिनेत्रीने मुस्लिम आणि दाक्षिणात्य मुलगी दोन्हीची उत्तमप्रकारे सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. अदा शर्मासह सर्वच कलाकारांनी दर्देदार कामगिरी केली आहे.
सुदिप्तो सेनच्या दिग्दर्शनाचंदेखील कौतुक. केरळ महाविद्यालय ते ISIS चं जग सर्वंच गोष्टी प्रेक्षकांना सिनेमात गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. विरेश आणि बिसाख ज्योतीने खूप चांगल्या प्रकारे या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. सिनेमाचं कथानक पुढे जाण्यासाठी ही गाणी फायदेशीर ठरतात. या गाण्याचे बोल प्रेक्षकांना भावतात. एकंदरीतच 'द केरळ स्टोरी' हा भावनिक सिनेमा आहे.
'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. केरळमधील महिलांची फसवणूक होते. त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं जात. त्यानंतर या मुलींना आयएसएसच्या आतंकवाद्यांसोर उभं केलं जातं. त्यानंतर अंगावर शहारे आणणाऱ्या खेळाला सुरुवात होते.