Darlings Movie Review : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आलियाचा 'डार्लिंग्स' (Darligs) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आलिया एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्या 'डार्लिंग्स' सिनेमाकडून प्रेक्षकांना उत्सुकता होती. आलियाचा 'डार्लिंग्स' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.


कौटुंबिक हिंसाचारावर भाष्य करणारा 'डार्लिंग्स' हा सिनेमा आहे. या सिनेमात आलियाने बदरू हे पात्र साकारलं आहे. तर विजय वर्मा हमजाच्या भूमिकेत आहे. कौटुंबिक हिंसाचारावर आधारित या सिनेमात सामाजिक परिस्थिती चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण अडीच तासाचा हा सिनेमा कुठेतरी कंटाळवाणा वाटतो. 


धारावी, भायखळा भागातील हिंदी भाषेचा वापर 'डार्लिंग्स'मध्ये करण्यात आला आहे. सिनेमाची भाषा, संवाद, पटकखा सर्वच उत्तम आहे. या सिनेमाला गुलजार, विशाल भारद्वाज यांनी संगीत दिलं आहे. पण या सिनेमाचं मुख्य आकर्षण आलिया आहे. या सिनेमात आलिया केंद्रस्थानी असल्याने हा सिनेमा पाहावा. कथानक जुने असले तरी ते नव्याने मांडण्याचा प्रयत्न सिनेमात करण्यात आला आहे. 


'डार्लिंग्स'मधील आलियाचे कामाच्या कौतुक करावे तितके कमी आहे. या सिनेमाला मुंबईचा टच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेफाली शाहनेदेखील तिच्या भूमिकेला योग्य पद्धतीने न्याय दिला आहे. विजय वर्माचे पात्र ग्रे शेड असले तरी त्यांचा दर्जेदार अभिनय मानला पाहिजे. सिनेमातील सर्वच कलाकारांनी चांगल काम करण्याचा प्रयत्न केला आहे. 


'डार्लिंग्स' हा सिनेमा डार्क कॉमेडीमध्ये मोडला जात असला तरी सिनेमात अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हा सिनेमा आलिया, विजय आणि शेफालीच्या कामासाठी पाहायला हवा. जसमीत के रीन यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. दिग्दर्शकाचा हा पहिलाच सिनेमा आहे हे सिनेमा पाहणात कुठेही जानवत नाही. पटकथेवर आणखी मेहनत घेतली असती तर सिनेमा अधिक चांगला झाला असता.