Alia Bhatt Darlings : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) डार्लिंग्स (Darlings) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आलिया सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. सध्या बायकॉट लाल सिंह चड्ढा आणि बायकॉट रक्षाबंधन सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. आता आलियाचा डार्लिंग्स हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी बायकॉट आलिया भट्ट हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.  डार्लिंग्स या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. यामध्ये आलिया ही तिच्या पतीला मारताना दिसत होती. त्यामुळे घरगुती हिंसाचाराला समर्थन करण्याचा आरोप नेटकरी आलियावर करत आहेत. त्यामुळे नेटकरी आलियाच्या या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. 


डार्लिंग्स या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, आलिया ही आपल्या पतीचे अपहरण करुन त्याला मारते. आलिया पुरुषांवरील घरगुती हिंसाचाराचे समर्थन करत आहे, असा आरोप नेटकऱ्यांनी आलियावर केला आहे. डार्लिंग्सच्या ट्रेलरमध्ये आलिया ही तिच्या पतीच्या तोंडावर पाणी फेकताना, माराताना दिसत आहे. एका नेटकऱ्यांनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं, 'मी सर्व पुरषांना आणि महिलांना अपील करतो की आलिया भट्ट आणि डार्लिंग्स चित्रपटाला बायकॉट करा. '










डार्लिंग्स हा चित्रपट 5 ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय वर्माने आलिया भट्टच्या पतीची भूमिका साकारली आहे. डार्लिंग्स या चित्रपटाचे दिग्दर्शन जसमीत के रीन यांनी केलं आहे. तर आलिया भट्टच्या इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन आणि शाहरुख आणि गौरी खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. आलियाचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


वाचा सविस्तर बातम्या: