Tu Jhoothi Main Makkar Movie Review : 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkar) असं सिनेमाचं नाव असलं तरी मनोरंजनाच्या बाबतीत हा सिनेमा पूर्णपणे विरुद्ध आहे. या सिनेमाच्या पोस्टर, टीझरवरुन हा सिनेमा रोमॅंटिक असेल असा अंदाज वर्तवला जात होता. हा सिनेमा रोमॅंटिक असला तरी कौटुंबिकदेखील आहे. 


रोमान्स, मैत्री, प्रेम, भावना अशा अनेक गोष्टींची सांगड 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमात घालण्यात आली आहे. या सिनेमाचं कथानक फ्रेश असलं तरी सर्व वयोगटातील मंडळींना आकर्षित करणारं आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. रणबीर आणि श्रद्धा दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यानंतर कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचतं.


रणबीर आणि श्रद्धाच्या लग्नापर्यंत गोष्टी पुढे सरकतात आणि सिनेमात नवा ट्विस्ट येतो. आता हा ट्विस्ट नक्की काय असेल हे प्रेक्षकांना सिनेमा पाहिल्यावरच कळेल. 'तू झूठी मैं मक्कार'  सिनेमाची प्रेमकथा असली तरी हा सिनेमा कौटुंबिक आहे. प्रेम आणि कुटुंब यांची सांगड घालणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाची कथा हळुवार वेगाने सुरू होते पण मध्यंतरादरम्यान वेग घेते. 


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने आपल्या भूमिकेत 100% दिले आहेत. तर दुसरीकडे श्रद्धाने आपली भूमिका चोख बजावली आहे. दोघांच्याही अभिनयाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. अनुभव सिंहचं विनोदाचं टायमिंग अचूक आहे. डिंपल कपाडियानेदेखील आपल्या भूमिकेची छाप सोडली आहे. कार्तिक आर्यन आणि नुसरत भरुचाच्या अभिनयाची झलकदेखील प्रेक्षकांना या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. बोनी कपूरचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना दिसला आहे. 


'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा लव रंजनने सांभाळली आहे. त्याचा स्वत:चा एक वेगळा जॉनर आहे. 'सोनू के टीटू की स्वीटी' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. आता 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमातील संवाद, डायलॉग प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारे आहेत. सिनेमातील पहिला भाग कंटाळवाणा वाटत असला तरी दुसऱ्या भागाने चांगलाच जोर पकडला आहे. 


'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमातील गाणी खूपच कमाल आहे. सिनेमाचं कथानक पुढे सरकवण्यासाठी गाण्यांचा योग्य वापर करण्यात आला आहे. गाण्यांतील रणबीर-श्रद्धाचा रोमॅंटिक अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अरिजीतीच्या आवाजातील बेदर्दिया हे गाणं गुणगुणत प्रेक्षक सिनेमागृहाबाहेर पडतो. सिनेमेट्रोग्राफीदेखील उत्तम झाली आहेत. सिनेमातील पहिल्या भागावर थोडी मेहनत घ्यायला हवी होती. पण एकंदरीतच हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजक करण्यात कुठेही कमी पडलेला नाही.