Tu Jhoothi Main Makkaar Leaked: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  आणि अभिनेत्री श्रद्धा कापूर (Shraddha Kapoor) यांच्या 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आज (8 मार्च) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाच्या तिकीटांची अॅडव्हान्स बुकिंग अनेकांनी केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, असा अंदाज लावला जात आहे. पण आता या चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. कारण हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. हा चित्रपट लीक झाल्याचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर परिणाम होईल, असं म्हटलं जात आहे. 


चित्रपट झाला लीक  


एका संकेतस्थळानं दिलेल्या माहितीनुसार, 'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट लीक झाला असून हा चित्रपट एचडी क्वालिटीमध्ये फिल्मीजिला, मूवीरूल्ज, टेलिग्राम, तमिळ रॉकर्स या साइट्सवर उपलब्ध आहे. श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांचा हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यानं आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरेल का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. 






‘तू झूठी मैं मक्कार’चे बॉक्स ऑफिस प्रिडिक्शन


आज रिलीज झालेल्या ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटामध्ये पहिल्यांदाच रणबीर आणि श्रद्धा ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट ओपनिंग-डे ला 11 ते 12  कोटींचे कलेक्शन करेल, असा अंदाज लावला जात होता. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटाच्या ट्रेलरनं देखील अनेकांचे लक्ष वेधले आहे.  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. 


 ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटात स्टँड-अप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सीनं आणि डिंपल कपाडिया, बोनी कपूर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लव्ह रंजन यांनी केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे.  


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Tu Jhoothi Main Makkaar Trailer released: रोमान्स अन् कॉमेडीचा तडका; रणबीर अन् श्रद्धाच्या 'तू झूठी मैं मक्कार' चा ट्रेलर रिलीज