Merry Christmas Review : विकी कौशलचं (Vicky Kaushal) नशीब खूप चांगलं आहे. 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) या सिनेमात विकीची झलक पाहायला मिळालेली नाही. पण मी असं का म्हणून हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण रिवह्यू नक्की वाचा. चांगल्या सिनेमासाठी मोठं बजेट, सेट, महागडे कपडे या गोष्टींची आवश्यकता नसते हे हा सिनेमा पाहताना जाणवतं. कोणताही दिखावा न करता एका रात्रीची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
'मेरी ख्रिसमस'ची गोष्ट काय आहे? (Merry Christmas Story)
'मेरी ख्रिसमस'ची गोष्ट या सिनेमाची जान आहे. ख्रिसमसमधील एका रात्रीची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. कतरिना कैफ (Katrina Kaif) आपल्या छोट्या मुलीसोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी गेली आहे. दुसरीकडे विजय सेतुपती (Vijay Sethupathi) सात वर्षांनी ख्रिसमससाठी शहरात आला आहे. दरम्यान एक खूण होतो. आता हा खूण कोणाचा होतो कोणं करतं हे जाणून घेण्यासाठी सिनेमा पाहा. पुढे सिनेमात संजय कपूर आणि विनय पाठक यांची एन्ट्री होते. आता पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी सिनेमाचा पाहावा लागेल.
'मेरी ख्रिसमस' कसा आहे?
'मेरी ख्रिसमस' हा जबरदस्त थ्रिलर सिनेमा आहे. ओपनिंग शॉटचं कमाल आहे. एक उत्तम मसालापट तयार झाला आहे. सिनेमा अगदी पहिल्या सीनपासूनच प्रेक्षकांना खूर्चीला खिळवून ठेवतो. सिनेमा प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. सिनेमातील वन लायनर कमाल आहेत. जबरदस्तीने विनोद आणण्याचा प्रयत्न सिनेमात करण्यात आलेला नाही. मध्यांतर कधी होतो हेदेखील कळत नाही. मध्यांतरानंतर सिनेमात ट्विस्ट येतो. सिनेमा पाहताना प्रेक्षक थक्क होतो.
विजय-कतरिनाच्या अभिनयाची कमाल
विजय सेतुपतीने 'मेरी ख्रिसमस' या सिनेमात सटल अभिनय केला आहे. पण वन लाईनर्सची संवादफेक त्यांनी कमाल केली आहे. दुसरीकडे कतरिना कैफनेदेखील शानदार काम केलं आहे. सिनेमात ती खूप सुंदर दिसत आहे.
कतरिना आणि विजयची केमिस्ट्री खूपच कमाल झाली आहे. दोघे वेगळ्या धाटणीचे कलाकार असले तरी त्यांनी आपली भूमिका चोख निभावली आहे. सिनेमातील एका दृश्यात कतरिना आणि विजय डान्स करतात. त्यावेळी प्रेक्षकांना विकीची आठवण येते. संजय कपूरनेदेखील भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. राधिका आपटेची भूमिका छोटी असली तरी लक्षात राहते.
'बदलापुर' आणि 'अंधाधुन' या सिनेमानंतर श्रीराम राघवन यांनी जवळपास सहा वर्षांनी 'मेरी ख्रिसमस' या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक केला आहे. पण करी सिनेमाच्या दुसऱ्या भागावर आणखी मेहनत घ्यायला हवी होती, असं वाटतं. प्रीतमचं संगीत उत्तम आहे. एकंदरीतच हा एक उत्कृष्ट थ्रिलर सिनेमा आहे. साऊथचा हिरो आणि बॉलिवूडची हीरोइन ही जोडी पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.