Main Atal Hoon : बॉलिवूडचा अभ्यासू अभिनेता, ओटीटी विश्व गाजवणारा पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सध्या 'मैं अटल हूं' (Main Atal Hoon) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील 'हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग-रग हिंदू मेरा परिचय' हे नवं गाणं आऊट झालं आहे.


'मैं अटल हूं'मधील नवं गाणं आऊट!


पंकज त्रिपाठी यांनी 'हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग-रग हिंदू मेरा परिचय' या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या ज्या कवितेवर तुम्ही प्रेम केलं त्या हिंदू तन मनचा सुरेल अंदाज. गाणं आज रिलीज झालं आहे. सिनेमा 19 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होईल". 


'हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग-रग हिंदू मेरा परिचय'  हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. गायक कैलास खेर यांनी आपल्या शानदार आवाजात हे गाणं गायलं आहे. तर अमितराज यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. 


'मैं अटल हूं'बद्दल जाणून घ्या...


'मैं अटल हूं' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधवने सांभाळली आहे. तर ऋषी विरमानु यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका पंकज त्रिपाठी यांनी साकारली आहे. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओच्या बॅनरअंतर्गत विनोद भानुशाली, संदीप सिंह आणि कमलेश भानुशाली यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.


पंकज त्रिपाठींचा सिनेप्रवास (Pankaj Tripathi Movies)


पंकज त्रिपाठी यांच्या 'ओएमजी 2' (OMG 2) आणि 'फुकरे 3' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. त्यांची 'कडक सिंह' ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपुर'मुळे त्यांना चांगली ओळख मिळाली आहे. या सिनेमात त्यांनी साकारलेली सुल्तान कुरैशीची भूमिका चांगलीच गाजली. पंकज त्रिपाठी सध्या 'मैं अटल हूं' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल. 'मेट्रो इन दिनो' आणि 'स्त्री 2' या सिनेमांचही ते शूटिंग करत आहेत.


'मैं अटल हूं' कधी रिलीज होणार? (Main Atal Hoon Release Date)


'मैं अटल हूं' हा सिनेमा 19 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. 'मैं अटल हूं' या सिनेमात पंकज त्रिपाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत झळकणार आहेत.


संबंधित बातम्या


Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठींना राजकारणात करायचं होतं करिअर; 'त्या' घटनेने बदलला निर्णय