Mast Mein Rehne Ka: 'आयुष्यात आता काय राहिलंय ', हल्ली असं आत्ताच्या पंचविशी-तिशीतली पोरं म्हणतात सहज बोलून जातात. पण खरोखरच आयुष्याच्या गौऱ्या पुढं गेलेल्या, साठी ओलांडलेल्या मुंबईसारख्या मेट्रो सिटीच्या पोटात राहणाऱ्या एकट्या पुरुषाचं  किंवा एकट्या महिलेचं... सॉरी माफ करा, त्यांना आपण 'आज्जी' आणि 'आजोबा'चं म्हणूया, या दोघांनी त्यांच्या उरल्या सुरल्या आयुष्यात नवं ते काय शोधावं? साठी-सत्तरीच्या उंबऱ्यावर कोणत्याही मोठ्या शहरात राहताना  त्यांचं डेली स्ट्रगल कसं असतं आजूबाजूला असलेला समाज त्यांच्याकडे कसं पाहतो त्यांना स्वीकारतो हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. तर दुसरीकडे मुंबईत आपापल्या गावी कॉलेज संपवून पैसे कमवायला आलेल्या कोवळ्या वयाच्या मुला मुलीचं नातं कसं असेल? त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण  करायला काय काय भाग पडत असेल याचा कधी आपण एवढा खोलवर विचार केला असेलही कदाचित. तुम्ही आम्ही त्या फेजमधून जाणार आहोतच किंवा गेले असालही मात्र काहीही होउदे, कितीही संकटं येउदे तरीही आपण  मस्त कसं राहायचं हेच 'मस्त मे रहने का' (Mast Mein Rehne Ka) या सिनेमातून  गलीबॉय, राधे, तुफान या सारखे सिनेमे देणाऱ्या दिग्दर्शक विजय मौर्य (Vijay Maurya) ने क्लुप्त्या उलघडल्या आहेत.


'मस्त में रहने का'  (Mast Mein Rehne Ka)  सिनेमा बद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा अगदी गोड आहे, सिम्पल स्वीट अँड शॉर्ट आहे, तुम्हाला सुरवात ते शेवटापर्यंत धरून ठेवतो, अभिनय बापच केलाय जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता या दोघांनी... सोबतच त्यांच्या त्यांच्या सहकलाकारांनी मग राखी सावंत असो, पोलीस साकारणारे मराठमोळे कलाकार उदय सबनीस आणि प्रियदर्शन जाधव, प्रत्येकाने जीव लावलेली पात्र केली आहेत, पात्रांना अगदी जसं लिहलं गेलंय अगदी तसंच जिवंत देखील केलंय.


जॅकी श्रॉफ म्हणजेच 'कामथ' नावाचे मुंबईत एकटे राहणारे यंग आजोबा, जे पहाटे पार्कात सकाळी व्यायाम करणारे, त्यांची दिवसभराची कामं करून, रात्री राईस, बिर्याणीसोबत दोन खंबे रिचवणारे मरणाची वाट पाहत असलेला गृहस्थ. तर दुसरीकडे महिलांचे ब्लाउज शिवणार साधा भोळा टेलर 'नन्हें' साकारलाय अभिषेक चौहान याने जो मुंबईत नवा असतो. पण प्रामाणिक आणि त्याच्या सरळ बोलण्यामुळं सतत माती खाणारा, मेहनती आणि कोणाचंही वाईट न चिंतणारा पण त्याला पैश्याच्या अडचणी येतात आणि तो पहिली चोरी करायला तो म्हाताऱ्या 'कामथ' म्हणजेच  जॅकी दादांच् घर निवडतो, तशीच चोरी तो नीना गुप्ता म्हणजे सेम एक खमक्या आणि एकट्या राहायला  पसंत करण्या 'हंडा' या पंजाबी आज्जीच्या घरी देखील चोरी करतो.आणि इथून सुरू होते उलघडते  सिनेमाची गोड गोष्ट... सि


नेमाचा प्लॉट हा एकाकी पडलेल्यांच्या जोडीदाराच् महत्व अधोरेखित करतो. मग ते तरुण असो वा म्हातारपणी.... प्रत्येक वयात जो तो त्याचं आयुष्य जगण्यासाठी स्वप्नं पूर्ण कर करण्यासाठी काय नाही करतो.ते या सिनेमात अगदी सहज दाखवलंय... पंजाबी बाई, कर्नाटकी आजोबा आणि टेलर त्याची प्रेयसी, त्याचा मित्र आणि मदतीला धावून येणारे मराठी पोलीस यांच्या मिश्किल गोडव्याचा सस्पेंस पाहताना दोन तास कसे निघून जातील हे कळणार देखील नाही.


बॅकग्राऊंड म्युजिक खूपच सुंदर साजेसं आहे, कथा स्क्रिप्ट एकदम हटके.जॅकी श्रॉफ, नीना गुप्ता यांचा  तगडा आणि जीव ओतणारा अभिनय कधी मिश्किल हसू आणतो,तर कधी डोळ्यात पाणी तर कधी त्यांच्या सहसाने अचंबित करणारा आहे, सिनेमा संथ आहे शेवटी जरा घाईघाईने उरकल्या सारखा वाटतो,सिनेमात राखी सावंत सुद्धा लक्षवेधी ठरते, तिने अभिनयाला थोडं गांभीर्याने घेतलं तर तिला पुढे सिनेमात पाहायला देखील आवडेलच यात शंका नाही!


सिनेमा प्रत्येकाने पाहायलाच हवा, 'मस्त मे रहने का' (Mast Mein Rehne Ka) अमेझॉन प्राईम वरती रिलीज झालाय, पटकन पाहा, दोनच तास तुमचा वेळ घेणार आहे मात्र त्या बदल्यात एक आगळ्या वेगळ्या वयांच्या साथीदारांचं प्रेम, मैत्री त्यांचं नातं आयुष्याचं स्ट्रगल तुमच्या मनाचा ठाव नक्की घेईल! या सिनेमाच्या दिग्दर्शनाला, कथेला, जॅकी, नीना गुप्ताच्या अभिनयाला 
मी देतोय साडे तीन स्टार!

विनीत वैद्य यांचे अन्य Movie Reviews!

Bhakshak Movie Review : वाचा रिव्ह्यू!
Three Of Us Movie Review: कसा आहे थ्री ऑफ अस?