Arjun kapoor Kuttey Review : 'कुत्ते' (Kuttey) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमाच्या नावावरुन या सिनेमात नक्की काय असेल याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


'कुत्ते' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आसमान भारद्वाजने सांभाळली आहे. या सिनेमाचं नाव 'कुत्ते' असल्याने तसेच या सिनेमाचं दिग्दर्शन 'कमीने' सारखा सिनेमा केलेल्या विशाल भारद्वाजच्या मुलाने केल्याने या सिनेमात नक्की काय पाहायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. 


'कुत्ते' या सिनेमाचं कथानक या सिनेमाची खासियत आहे. सिनेमातील सर्वत्र पात्रे एका पेक्षा एक आहेत. सिनेमातील ट्वीस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात विचार येतो, प्रत्येक माणूस हा कुत्र्यासारखाच असतो". 


'कुत्ते' या सिनेमातील सर्वच कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. तब्बूच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तिने साकारलेली पोलीस अधिकारीची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. अर्जुन कपूरनेदेखील सिनेमात आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. नसीरुद्दीन शाहची सिनेमातील झलक पाहण्याजोगी आहे. राधिका मदाननदेखील कमाल काम केलं आहे. 


आसमान भारद्वाजने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. सिनेमाची सुरुवात, मध्य आणि शेवट कुठेही प्रेक्षकांना कंटाळवाणा वाटत नाही. सिनेमाची कथा प्रेक्षकांना गुंतवून गुंतवून आहे. आसमानच्या दिग्दर्शनात हा त्याचा पहिलाच सिनेमा आहे हे कुठेही जाणवत नाही.


'कुत्ते' या सिनेमातील गाणी गुलजारांनी लिहिलेली आहेत. प्रत्येक गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. ही गाणी विशाल भारद्वाजने संगीतबद्ध केली आहेत. संगीताने सिनेमाला एक वेगळं वलय प्राप्त झालं आहे. जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे सिनेमे पाहायला आवडत असतील तर 'कुत्ते' हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आवडेल.  


एका करप्ट पोलीस अधिकाऱ्यावर भाष्य करणारा 'कुत्ते' हा सिनेमा आहे. या सिनेमात अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाज, लव रंजन, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.


लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज निर्मित, 'कुत्ते'हा सिनेमा गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारा प्रस्तुत आहे. तसेच या सिनेमाला विशाल भारद्वाजने संगीत दिलं असून गुलजार यांनी गीते लिहिली आहेत.


संबंधित बातम्या


Kuttey Trailer : एक हड्डी और सात तुकडे; अर्जुन कपूरच्या 'कुत्ते'चा टीझर आऊट