Bigg Boss 16 : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत (Salman Khan) स्क्रीन शेअर करणं प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. कॉमेडी क्वीन भारती सिंहचा (Bharti Singh) गोला (Golla) मात्र याला अपवाद ठरला आहे. 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) आगामी भागात सलमान खानसोबत गोला स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 


'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये भारती सिंह, गोला आणि सलमान खानची झलक पाहायला मिळत आहे. भारतीला भाईजान म्हणाला होता,"भारतीच्या लेकाला मी लॉंच करणार". भारती आणि तिच्या गोंडस मुलाला 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) मंचावर पाहिल्यानंतर चाहते मात्र आनंदी झाले आहेत. सलमानने गोलाला कडेवर घेतलेलं दिसत आहे. 






भारती सिंह सलमानला म्हणत आहे,"मी खूप थकली आहे. तुम्ही थोडावेळ गोलाला पकडाल का". त्यावर भाईजान म्हणाला,"थकणारचं". यावर उत्तर देत भारती म्हणाली,"हा भारतीचा मुलगा आहे". सलमान आणि भारतीच्या या संवादाने चाहत्यांचं मात्र चांगलच मनोरंजन झालं आहे. 


सलमान खानने पहिल्याच भेटीत गोलाला त्याचं सिग्नेचर ब्रेसलेट भेट म्हणून दिलं आहे. त्यानंतर भारतीने एका पेपरवर त्याची ऑटोग्राफ घेतली आहे. ऑटोग्राफ घेतल्यानंतर भारती भाईजानला म्हणते,"तुम्ही तुमचं पनवेलचं फार्म हाऊस कधी खाली करणार आहात?". सलमानने सही केलेले पेपर हे सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊसमधील आहेत. 


बिग बॉस मराठीचं चौथं पर्व संपल्याने सध्या चाहत्यांनी हिंदी बिग बॉसवर लक्ष केंद्रीत केलं आहे. हिंदी 'बिग बॉस'मध्ये यंदा कोण बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 16: 'आईला तुझा अभिमान वाटतो'; भावाला पाहून ढसाढसा रडली फराह खान; नेटकरी म्हणाले, 'त्यानं केलंय काय?'