Kota Factory Season 3 review : मजे ही मजे, या ओळी आजकाल रील्सवर खूप व्हायरल होत आहेत. त्यातच कोटा फॅक्ट्रीचा तिसरा सिझन पाहून तुम्हाला कंटेंटची देखील मज्जा घेता येणार आहे. आधी पंचायत 3 मग गुल्लक 3 आणि आता कोटा फॅक्ट्री 3, चांगला कंटेंट पाहणाऱ्यांसाठी सध्या ओटीटीवर मज्जाच मज्जा आहे. त्याचा ट्रेलर अतिशय शांततेत आला आणि योग्य प्रमोशन केले गेले. पण हा सीझनच असा आहे की, प्रेक्षकच त्याला प्रमोट करत आहेत आणि हीच एका चांगल्या कंटेंटची ताकद आहे. कोटा फॅक्ट्रीचा तिसरा सिझनही मनाला भिडणारा आहे. हा सिझनही तुमच्या डोळ्यात पाणी आणेल आणि तुम्हाला खूप अनुभव देईल.
गोष्ट - कोटामध्ये जितू भैय्याने स्वत:चं सेंटर सुरु केलं आहे. पण असं काही घडतं की त्यामुळे तो काळजीत पडतो. जेईई मेन आणि ॲडव्हान्सची तयारी जोरात सुरू आहे. त्याचेही वाईट परिणाम दिसत आहेत, काही मुले वाईट संगतीतही पडली आहेत, काय होईल यश मिळेल, आयआयटीमध्ये कोण जाऊ शकेल आणि जे गेले नाहीत त्यांचे काय होईल, असं सगळं या सिरिजमध्ये आहे. ही गोष्ट तुमची आहे, तुम्हाला तुमची शाळा, कॉलेज, तुमच्या मुलांची शाळा, त्यांचे कॉलेज, त्यांचे दडपण जाणवेल. या सिरिजची गोष्ट अजून सांगणं हे या शोसाठी चांगलं ठरणार नाही.
अभिनय - जीतू भैय्या आता फक्त शिकवत नाहीयेत, तर एक लढाईही लढत आहे आणि ती देखील स्वत:शीच. जितेंद्रने जीतू भैया आणि जीतू सर यांच्यातील संघर्ष ज्या प्रकारे मांडला आहे, ते खरोखरच तुमच्या हृदयाला भिडते. यामुळे कळतं की, तो खऱ्या आयुष्यात तसा कमी बोलतो पण तो पडद्यावर ज्या प्रकारे बोलतो त्यामुळे तुमच्या डोळ्यात अश्रूच येतात. पूजा मॅम किंवा पूजा दीदी, हे पात्र तिलोतीमा शोमने साकारले आहे. तिच्यासाठी ही आणखी एक नवी आणि मोठी सुरुवात असावी असे वाटते.
या सिरिजमधील प्रत्येक पात्र मनाला भिडतं. राजेश कुमार एक अप्रतिम अभिनेता आहे आणि मयूर मोरे नेहमीप्रमाणेच तो अप्रतिम आहे. जेव्हा तो अस्वस्थ होऊन रडतो तेव्हा तुम्हाला तुमचे दिवस आठवतात. रंजन राजचे काम नेहमीप्रमाणेच चमकदार आहे, तो एक वेगळा रंग जोडतो जो खूप गोंडस दिसतो. आलम खानचे उदय हे पात्र अनेकांचे आवडते आहे कारण बहुतेक लोक उदय आहेत. उदय तुम्हाला हसवण्याबरोबरच रडवायला लावेल, अहसास चन्नाचे कामही अप्रतिम आहे, ती शिवांगी सारख्या सशक्त मुलीची व्यक्तिरेखा अप्रतिमपणे साकारत आहे. वती पिल्लईनेही पुन्हा अप्रतिम काम केले आहे.
कशी आहे सिरिज?
ही सिरिज पाहून तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या जवळच्या लोकांच्या अनेक गोष्टी आठवतील. ही सिरिज तुम्हाला तुमच्या चुकांची देखील जाणीव होईल, तुम्हाला रडवेल, शिकवेल आणि एंटरटेन देखील करेल. जर हा शो एवढं सगळं करत असेल तर तो कमालच असेल.
दिग्दर्शन - पुनीत बत्रा आणि प्रवीण यादवने ही गोष्ट लिहिली असून प्रतीश मेहताने दिग्दर्शन केलं आहे. आणि TVF च्या प्रत्येक सिरिजप्रमाणे या सिरिजचे लेखक आणि दिग्दर्शक याचे हिरो आहेत. गोष्ट कमाल लिहिली आहे, एक एक सीन फिल होतो.
मी या सिरिजला देतोय 4 स्टार्स