Sukh Mhanje Nakki Kay Astaसुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. या मालिकेतील जयदीप आणि गौरी यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच मालिकेतील चिमुकली लक्ष्मी ही देखील प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत मंगलची एन्ट्री झाली आहे.  नुकताच या मालिकेच्या एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये जयदीप हा गौरीवर चिडलेला दिसत आहे.


सुख म्हणजे नक्की काय असतं या प्रोमोमध्ये देवकी ही शालिनीचे पाय दाबताना दिसत आहे.  देवकी ही शालिनीला म्हणते, 'तुमचे पाय दाबून माझे हात दुखायला लागले.' त्यानंतर शालिनी ही देवकीला म्हणते, ' माझे पाय दाबल्यामुळे तू स्वर्गात जाशील.' देवकी आणि शालिनी यांच्यात संभाषण सुरु असतानाच तिथे मंगल  येते.  मंगल ही देवकी आणि शालिनी यांना म्हणते, 'उद्या बघाच ही मंगल काय करते.' त्यानंतर देवकी म्हणते, 'काय करणार तुम्ही' यावर मंगल म्हणते, 'जे तुमच्या दोघींनाही जमलं नाही ते.' 


त्यानंतर प्रोमोमध्ये दिसत आहे की, गौरी ही  माई यांना चहा देते. त्यानंतर  जयदीप तिथे येतो. जयदीप माई यांना विचारतो की, "तू आज लक्ष्मीला शाळेत सोडायला गेली नाहीस का?" त्यानंतर गौरी जयदीपला सांगते की, लक्ष्मीला मंगल शाळेत सोडायला गेली आहे. हे ऐकून जयदीप चिडतो.  आता मंगलच्या डोक्यात कोणता  नवा प्लॅन शिजतोय? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


पाहा प्रोमो: 






सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक या मंगल ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. तसेच या मालिकेत गिरिजा प्रभू, मंदार जाधव, माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: लक्ष्मीवर चुकीचे संस्कार होऊ नयेत म्हणून काय पाऊल उचलेल जयदीप? 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेच्या नव्या प्रोमोनं वेधलं लक्ष