Heart Of Stone Movie Review : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) अभिनीत 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart Of Stone) हा हॉलिवूडपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा अभिनेत्रीचा पहिलाच हॉलिवूडपट असल्याने या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण पहिलाच हॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे.


'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमात आलिया भट्ट नकारात्मक भूमिकेत दिसली आहे. आलिया बॉलिवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री असली तरी हॉलिवूडमध्ये आपली जादू दाखवण्यात कमी पडली आहे. सिनेमाच्या कथानकात कुठेतरी कमी जाणवते. पण तरीही सिनेमातील काही अॅक्शन सीक्वेन्सचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या अॅक्शनच्या दृश्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.


हॉलिवूड सिनेमात भारतीय कलाकारांना स्थान ही गोष्ट फार चर्चेचा विषय असते. 'हार्ट ऑफ स्टोन'च्या बाबतीत बोलायचं झालं तर  आलिया भट्टच्या अभिनयाकडे सर्वांचं लक्ष होतं, सुरुवातीला ती सायफाय विश्वातली सिनेमाच्या मुख्य पात्रा एवढी दुसरी महत्वाची भूमिका साकारली आहे. भूमिका लक्षवेधी होती मात्र जसा जसा सिनेमा पुढे जातो आलियाचा नेहमीचा अल्लडपणा पाहायला मिळतो आणि त्या पात्राविषयीचं गांभीर्यच निघून जातं आणि सिनेमाची कथा भक्कम झालेली पूर्णपणे ढिली पडते. आलियाचा कॉमेडी अंदाजाने मात्र या सिनेमात निराशा आणली.


'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमाची गोष्ट खूपच सजवलेली आहे, असं वाटतं. दिग्दर्शक टॉम हार्पर यांनी सिनेमावर आणखी थोडी मेहनत घ्यायला हवी होती, असं सिनेमा पाहताना वारंवार जाणवतं. आलिया भट्टसह गैल गैडट, जैमी डोरनन हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर ग्रेगा रुका यांनी लिहिलेल्या या सीरिजचं दिग्दर्शन टॉम हारपर यांनी केलं आहे. 
 
आलियाची 'हार्ट ऑफ स्टोन' ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. थरार, नाट्य असणारा हा हॉलिवूड सिनेमा आहे. आलिया आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्यात कमी पडली आहे. एकंदरीतच सिनेमातील सर्वच कलाकारांनी साधारण काम केलं आहे. सिनेमाचं शूटिंग खूपच रोमांचक ठिकाणी झालं आहे.


आलिया भट्ट आजवर एक गोड अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पण या सिनेमाच्या माध्यमातून तिचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला. तिने साकारलेल्या खलनायिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सिनेमाचं कथानक, संवाद आणि पात्रांवर आणखी मेहनत घ्यायला हवी होती. पण आता 'हॉर्ट ऑफ स्टोन'नंतर आलियाला हॉलिवूडचं दार खुलं झालं आहे.


'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमावर मेहनत घेतली असती तर सिनेमा आणखी चांगला झाला असता. सिनेमा सुरू झाल्यावर या सिनेमाची तुलना 'सिटाडेल' या वेबसीरिजसोबत होते. सिनेमाचं कथानक चांगलं असतं आणि सिनेमाची मांडणी योग्यपद्धतीने झाली असती तर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळाली असती.


सिनेमाचं कथानक जरी कमी पडलं असलं तरी सिनेमातील अॅक्शच तडका मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमातील गाणीदेखील चांगली आहेत. अॅक्शनला आणखी मजेशीर करण्यात ही गाणी उपयुक्त ठरतात. तुम्हाला जर अॅक्शनपटांची आवड असेल आणि तुम्ही आलिया भट्टचे चाहते असाल तर तुम्ही हा सिनेमा नक्कीच पाहू शकता.