Ghoomer Review : 'घूमर' (Ghoomer) या सिनेमात अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळतोय.'पा', 'चुप', 'पॅडमॅन', 'चीनी कम' असे अनेक दमदार चित्रपट देणारे दिग्दर्शक आर. बाल्की (R. Balki) पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी 'घूमर' हा नवा चित्रपट घेऊन आले आहेत.


अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयमी खेर (Saiyami Kher) यांच्यासोबत, आर बाल्की (R. Balki) यांनी अशी कथा आणली आहे, ज्यामध्ये निराशा आणि आशा आहे, ज्यामध्ये ऊर्जा आणि उत्साह आहे, ज्यामध्ये जीवनासाठी लढण्याची उमेद आहे. चला तर मग जाणून घेऊया एका हाताने मुलीला क्रिकेट शिकवण्याच्या कथेवर कसा बनवला आहे हा सिनेमा...


भारतीय संघात खेळू इच्छिणाऱ्या अनिनी नावाच्या महिला क्रिकेटरची म्हणजेच सैयमी खेरची ही कथा आहे. तिची भारतीय क्रिकेट संघात निवडही होते पण अपघातात तिचा एक हात जातो. त्यामुळे ती आता फलंदाजी करू शकत नाही. मग ती भारतीय संघात कशी खेळणार असा प्रश्न उपस्थित होतो. अशा परिस्थितीत एकेकाळी कसोटी क्रिकेट खेळलेले पदम सिंह सोढी म्हणजेच अभिषेक बच्चन तिच्या आयुष्यात येतात आणि तिला सांगतात की क्रिकेट म्हणजे फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजीही आहे आणि ती गोलंदाजी करू शकते. त्यानंतर तिला प्रशिक्षण दिले जाते आणि पुढे काय तर एका हॅपी एंडिंग सिनेमा सारखा हॅपी एंडिंग दाखवलाय.


आर बाल्कीच्या दिग्दर्शनाबद्दल बोलायचे झाले तर यावेळीही तो नेहमीप्रमाणेच परफेक्ट आहे. सुरुवातीला सिनेमा संथ वाटतो, ट्रॅकवर यायला वेळ लागतोय असं वाटायला लागतं पण सुरुवातीचे अनेक महत्त्वाचे सीन सिनेमाला आणखी चांगलं बनवण्यात यशस्वी ठरले आहेत.


सैयमीचे सिनेमातील परिवर्तन अप्रतिम आहे. खरंतर सैयमी खऱ्या आयुष्यातही क्रिकेट खेळते. त्यामुळे एक आश्वासक फलंदाज आणि स्पिनरची भूमिका साकारणं ही तिच्यासाठी उत्तम संधी होती. सैयमीच्या पात्रात तुम्हाला प्रत्येक शॉट आणि अँगलने वेदना जाणवते. एक हात कापल्यानंतर तिची होणारी असहाय्यता आणि नंतर मैदानावर खेळतानाची तिची उर्जा दोन्ही आश्चर्यकारक आहे. आणि अंगद बेदी आणि शबाना आझमी यांनीही आपल्या अभिनयाने चित्रपट सशक्त केला आहे.


अमिताभ बच्चन यांच्या असण्याने सिनेमाची मोहकता वाढवली आहे. अमिताभ बच्चन सिनेमात समालोचकाच्या (Comentrater) भूमिकेत दिसत आहेत आणि पडद्यावर येताच ते ज्या प्रकारे ऊर्जा वाढवतात त्याला नेहमीसारखीच तोड नाही.


Ghoomer Movie Review : अभिषेक बच्चनचा 'घूमर' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...