Kedar Shinde On Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा 30 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. आज या सिनेमाला सिनेमागृहात प्रदर्शित होऊन 50 दिवस पूर्ण झाले आहेत. 50 दिवसांनंतरही या चाहत्यांमध्ये सिनेमाची क्रेझ कायम आहे. मोठा वीकेंडचा फायदा या सिनेमालाही झाला आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे.


'बाईपण भारी देवा'च्या यशाबद्दल बोलताना एबीपी माझाशी बोलताना केदार शिंदे म्हणाले,"बाईपण भारी देवा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून या सिनेमाला मिळणारं यश पाहून नक्कीच आनंद होत आहे. या सिनेमाचं यश हे संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टीचं आहे. रिलीजच्या 50 दिवसांत हा सिनेमा चांगला चालतोय आणि सिनेमाला थिएटर मिळत आहेत. ही मराठी सिनेसृष्टीसाठी सुखावणारी बाब आहे". 


'बाईपण भारी देवा' हा सिनेमा पाहायला संपूर्ण कुटुंब जात आहे : केदार शिंदे


केदार शिंदे पुढे म्हणाले,"बाईपण भारी देवा' हा सिनेमा महिलांनी डोक्यावर घेतला. एखाद्या सण साजरा करण्याप्रमाणे त्यांनी या सिनेमा पाहिला. सिनेमा महिलांवर भाष्य करणारा असल्यामुळे त्यांना हा सिनेमा भावला. आधी हा सिनेमा महिलांनी डोक्यावर घेतला. आता पुरुषदेखील या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा पाहायला संपूर्ण कुटुंब जात आहे. आधी महिलांनी हा सिनेमा पाहिला आणि आता कुटुंबियांना घेऊन ते हा सिनेमा पाहायला जात आहेत". 


'बाईपण भारी देवा' हा सिनेमा यशस्वी झाला आहे. सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी सिनेमा ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवण्यासोबत प्रेक्षकांवर जादू दाखवण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. याबद्दल बोलताना केदार शिंदे (Kedar Shinde On Baipan Bhaari Deva 2) म्हणाले,"बाईपण भारी देवा'च्या दुसऱ्या भागाबद्दल अद्याप विचार केलेला नाही. सध्यातरी 'बाईपण भारी देवा'चं यश साजरं करत आहोत. लोकांपर्यंत हा सिनेमा पोहोचावा यासाठी प्रयत्न करत आहोत". 


'बाईपण भारी देवा' या मराठी सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमांच्या स्पर्धेत हा सिनेमा तग धरुन आहे. मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या या सिनेमाचं मराठी सेलिब्रिटींपासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुंबई पोलीस ते प्रेक्षकांपर्यंत सर्वांनीच भरभरून कौतुक केलं आहे. आता हा सिनेमा फक्त 100 रुपयांत प्रेक्षकांना पाहता येत आहे. 


केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शत रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar), सुकन्या मोने (Sukanya Mone) आणि दीपा परब-चौधरी (Deepa Parab Choudhary) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Baipan Bhaari Deva: 'सहा लक्ष्मींच्या पावलाने चित्रपटगृहात...'; केदार शिंदे यांची खास पोस्ट