Fukrey 3 Movie Review : तणाव दूर व्हावा आणि मनोरंजन व्हावं यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात जातात. 'फुकरे 3' (Fukrey 3) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 


'फुकरे 3'चं कथानक काय आहे? (Fukrey 3 Movie Story)


'फुकरे 2'ची पुढची गोष्ट प्रेक्षकांना 'फुकरे 3'मध्ये (Fukrey 3 Movie Review) पाहायला मिळत आहे. भोली यांनी पंजाबच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. निवडणूक लढवण्यासाठी ते फुकरे टोळीची मदत घेण्याचं ठरवतात. त्यानंतर भोली फुकरे यांना दक्षिण आफ्रिकेत पाठवतो. त्यानंतर पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमागृहात जावे लागेल.


'फुकरे 3' कसा आहे? 


'फुकरे 3' हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आहे. खुर्चीला खिळवून ठेवणारा सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर करण्यात सिनेमाची टीम यशस्वी झाली आहे. 'फुकरे 3'चा फर्स्ट हाफ खूपच मजेदार आहे. सिनेमातील सर्वच संवाद प्रेक्षकांना खळखळून हसवणारे आहेत. मध्यांतरानंतरचा सिनेमा थोडासा कंटाळवाणा वाटतो. पण एकंदरीतच 'फुकरे 3' हा सिनेमा सिनेप्रेक्षक एकदा नक्कीच पाहू शकतात. 


'फुकरे 3' (Fukrey 3) या सिनेमातील सर्वच कलाकार एकापेक्षा एक आहेत. वरुण हा या सिनेमाची जाण आहे. त्याच्याशिवाय हा सिनेमा पूर्ण होऊ शकला नसता. या सिनेमाचा हीरो खऱ्या अर्थाने वरुण आहे. पुलकित सम्राटने हनीची भूमिका चोख बजावली आहे. तर पंजित जीच्या भूमिकेला पंकज त्रिपाठी यांनी योग्य न्याय दिला आहे. मनजोत सिंहने लालीची भूमिका साकारली आहे. भोली पंजाबी म्हणजेच ऋचा चड्ढाने चांगलं काम केलं आहे. 


मृगदीप सिंह यांनी 'फुकरे 3' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन उत्कृष्ट झालं आहे. पण या सिनेमावर आणखी थोडी मेहनत घ्यायला हवी होती, असं वारंवार वाटतं. या सिनेमातील गाणीदेखील खूप खास नाहीत. एकंदरीतच हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देणारा आहे. या सिनेमाचा पहिला आणि दुसरा भाग पाहिला नसेल तरी तिसरा भाग तुम्ही पाहू शकता.  


'फुकरे 3' हा विनोदी सिनेमा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन मृगदीप सिंह लांबा यांनी केलं आहे. वरुण शर्मा, पुलकित सम्राट, ऋचा चड्ढा, मंजोत सिंह आणि पंकज त्रिपाठी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Fukrey 3 Trailer Release: फुकरे-3 चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज; चित्रपट या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस