Dunki Movie Review: डंकी (Dunki) चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट इतका जबरदस्त असेल असे वाटले नव्हते. पण शाहरुख खानने (Shah Rukh Khan) त्याचा "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त..." हा डायलॉग  बरोबर सिद्ध केले. राजकुमार हिरानी यांनी पुन्हा स्वत:ला सिद्ध केले आहे. हा चित्रपट राजकुमार हिरानींचा चित्रपट आहे आणि हा चित्रपट शाहरुखनं राजकुमार हिरानींचा होऊ दिला ही त्यातील सर्वात खास गोष्ट आहे.



चित्रपटाचे कथानक


पंजाबमधील एका गावात राहणाऱ्या काही मित्रांना लंडनला जायचे आहे. तिथे गेल्याने आपली गरिबी संपेल असे त्यांना वाटत असते. त्यापैकी एकाला त्याच्या जुन्या गर्लफ्रेंडला घेण्यासाठी लंडनला जायचे असते, जिचा नवरा तिला मारहाण करत असतो. ते IELTS पेपरची तयारी करतात, पण ते इंग्रजी शिकू शकत नाहीत. मग ते  डंकी फ्लाइट म्हणजे बेकायदेशीरपणे लंडनमध्ये जातात. आणि मग काय होते? हे पाहण्यासाठी थिएटरमध्ये जा.


कसा आहे चित्रपट?



चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत अप्रतिम आहे. तुम्ही चुकवू शकता असा एकही सीन नाही. चित्रपटात कुठेही कंटाळा येत नाही. छान फ्लोनं चित्रपट पुढे जातो  आणि तुम्हाला हसवते, रडायला लावते आणि आश्चर्यचकित करतो. संपूर्ण चित्रपटात शाहरुखचा दबदबा दिसत नाही. हो, तुम्ही  बरोबर वाचले. बाकीच्या पात्रांना समान संधी मिळाली आहे आणि त्यामुळे चित्रपट आणखी चांगला झाला आहे. आपण प्रत्येक पात्राशी कनेक्ट होतो.हा चित्रपट तुम्ही संपूर्ण कुटुंबासह ते आरामात पाहू शकता.



कलाकारांचा अभिनय



चित्रपटात शाहरुख खानने अप्रतिम काम केले आहे. उर्वरित पात्रांनाही पूर्ण संधी देण्यात आली आहे. या चित्रपटात एक तरुण आणि एक म्हातारा शाहरुख दाखवण्यात आला आहे. त्याचा मेकअप थोडा चांगला करता आला असता पण चित्रपटाच्या फ्लोमध्ये त्याचा काही फरक पडत नाही. तापसी पन्नूने अप्रतिम काम केले आहे. शाहरुखसोबत ती खूप छान दिसत आहे. वृद्धापकाळाच्या पात्रातही तिनं चांगलं काम केलं आहे.



विकी कौशलने हे दाखवून दिले आहे की तो छोट्याशा व्यक्तिरेखेतूनही प्रेक्षकांवर मोठा प्रभाव टाकू शकतो. तो तुम्हाला हसवतो  आणि रडवतो देखील. विक्रम कोचरनं देखील अप्रतिम काम केलं आहे. तो  मने जिंकतो. अनिल ग्रोव्हरनेही अप्रतिम अभिनय केला आहे. बोमन इराणी आणि हिरानी यांची जोडी वर्षानुवर्षे  काम करत आहे आणि इथेही बोमनने अप्रतिम काम केले आहे.


चित्रपटाचे दिग्दर्शन 



राजकुमार हिरानी  यांचा हा चित्रपट आहे. शाहरुख खान राजकुमार हिरानी यांना मागे टाकू शकला नाही आणि त्यामुळेच हा चित्रपट अप्रतिम बनला आहे. त्याची कथा सांगण्याची पद्धत खूपच भावनिक आहे जी तुमच्यासोबत कनेक्ट होते. हा चित्रपट त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये गणला जाईल.


चित्रपटाचे म्युझिक


चित्रपटातील प्रीतमचे संगीत हृदयाला भिडते. कभी हम घर से गाणे जेव्हा चित्रपटात ऐकू येते तेव्हा पाणावतात. अमन पंतचा बॅकग्राउंड स्कोअर खूप चांगला आहे.



मुकेश छाबरा यांची कास्टिंग अप्रतिम आहे आणि हा चित्रपट इतका अप्रतिम होण्याचे हे एक मोठे कारण आहे. एकूणच हा वर्षातील सर्वोत्तम आहे.