Main Atal Hoon Trailer Out: प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या 'मैं अटल हूं' (Main Atal Hoon) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काल या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे . 'मैं अटल हूं' या चित्रपटाच्या ट्रेलरमधील पंकज त्रिपाठी यांच्या डायलॉग्सनं तसेच त्यांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


मुंबईत पार पडला ट्रेलर लाँच इव्हेंट


पंकज त्रिपाठी, चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव, निर्माते विनोद भानुशाली आणि निर्माते संदीप सिंग यांच्या उपस्थितीत 'मैं अटल हूं'  या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट आज मुंबईत पार पडला. यावेळी पंकज म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणे त्यांच्यासाठी सोपे काम नव्हते. कारण त्यांना अटलजींची भूमिका साकारताना मिमिक्री करायची नव्हती . पुढे ते म्हणाले की, संदीप सिंह त्यांना आयपॅडमध्ये व्हीएफएक्सद्वारे एडिट केलेला त्यांचा एक फोटो दाखवला होता ज्यामध्ये ते अटलजींसारखे दिसत होते.


पाहा ट्रेलर:






'मैं अटल हूं'  या चित्रपटाच्या ट्रेलरला कमेंट करुन अनेकजण पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत.  'मैं अटल हूं'  हा चित्रपट 19 जानेवारी 2023 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. आता पंकज त्रिपाठी यांच्या मैं अटल हूं' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


पंकज त्रिपाठी म्हणाले, "60 दिवस फक्त खिचडी खाल्ली"


एका मुलाखतीमध्ये  पंकज यांनी मैं अटल हूं या चित्रपटात अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारण्यासाठी केलेल्या तयारीबद्दल सांगितलं होतं. ते म्हणाले होते, "मी  मैं अटल हूं या चित्रपटाचे 60 दिवस शूटिंग केले आणि त्या 60  दिवसात मी फक्त खिचडी खाल्ली, तीही स्वतःच बनवली."


संबंधित बातम्या:


Main Atal HoonTeaser: "दलों के इस दल दल के बीच एक कमल खिलाना होगा"; 'मै अटल हूं' चा टीझर रिलीज