Drishyam 2 Movie Review : 'दृश्यम' (Drishyam 2) या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर लगेचच चाहते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करू लागले. त्यामुळे निर्मात्यांनी या सिनेमाचा दुसरा भाग रिलीज करण्याचा निर्णय घेतला. मुळात या सिनेमाच्या यशाचं श्रेय या सिनेमाच्या कथेला जातं.
'दृश्यम 2' या सिनेमाची कथा सुरुवातीला हळुवार पुढे सरकते. 'दृश्यम 2' हा मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमाबाबतची एक चांगली गोष्ट म्हणजे या सिनेमाचा हिंदीत रिमेक झाला असला तरी मूळ कथा मात्र प्रेक्षकांवर छाप सोडण्यात यशस्वी होते. यात दिग्दर्शक अभिषेक पाठकचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे मूळ मल्याळम सिनेमा पाहिल्यानंतरही हिंदी सिनेमाबद्दलची उत्सुकता कायम राहते.
'दृश्यम 2'मध्ये असणारे क्लायमेक्स सिनेमाची खरी ताकद आहेत. ज्याप्रमाणे जिलेबीची चव माहिती असतानाही आपण ती पुन्हा पुन्हा खायला पसंती दर्शवतो अगदी त्याचप्रमाणे या सिनेमाची कथा माहीत असतानाही हा सिनेमा प्रेक्षकांना सिनेमाची गोडी लावतो. या सिनेमातील कलाकार प्रसंगानुसार रंग बदलतात आणि याचीच सिनेमाचं इंद्रधनुष्य व्हायला मदत होते.
'दृश्यम 2' हा सिनेमा अजय देवगणभोवती फिरणारा आहे. या सिनेमात त्याने मोहनलालचे पात्र साकारले आहे. सटल आणि डोळ्यांचा अभिनय करण्यात अजय यशस्वी ठरला आहे. अजयसह तब्बू आणि रजत कपूरच्या कामाचंही कौतुक. तर दुसरीकडे सुधीर चौधरीने गोवा एका वेगळ्या नजरेने कॅमेऱ्यात कैद केलं आहे.
'दृश्यम 2'मध्ये अजयसह तब्बू, श्रेया सरन आणि इशिता दत्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर या सिनेमात तब्बू एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. पण अजय अभिनयाच्या बाबतीत या सर्वांमध्ये उजवा ठरत आहे. कारण सात वर्षांनंतरही तो अगदी तसाच दिसत आहे.
गोव्यात राहणारा विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबियांवर भाष्य करणारा 'दृश्यम 2' हा सिनेमा आहे. निशिकांत कामत यांनी 'दृश्यम'च्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन केलं होतं. पण आता त्यांच्या निधनानंतर अभिषेत पाठकने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
'दृश्यम 2' हा कौटुंबिक सिनेमा आहे. या सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन होणार आहे. सिनेमाची सुरुवातीची 20 मिनिटं कंटाळवाणी वाटतात. पण कथानक जस-जसे पुढे सरकते तसं प्रेक्षक सिनेमात गुंतत जातो.
'दृश्यम 2' या सिनेमाचं कथानक काय?
'दृश्यम 2'मध्ये विजय साळगावकर म्हणजेच अजय देवगण एका थिएटरचा मालक असलेलं दाखवण्यात आलं आहे. सिनेमांसाठी तो वेडा असल्याचे दिसते आहे. त्यामुळेच तो एका लेखकाची भेट घेतो. पण त्याच्या कथेवर तो समाधानी नसतो त्यामुळे पुन्हा कथानकावर काम करायला सुरुवात करतो. तर दुसरीकडे त्याचे कुटुंबीय सात वर्षांपूर्वी घडलेली घटना विसरलेले नाहीत. त्यामुळे आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहावा लागेल.