Double XL: 'वाढलेल्या वजनामुळे माझं मन मला खातंय', 'वाढलेल्या वजनामुळे हे काम मला करता येत नाही.' असं अनेक जण म्हणत असतात. बॉडी शेमिंग या विषयावर सध्या अनेक जण बिंधास्त बोलतात. पण बॉडी शेमिंग करणं, लोकांनी बंद केलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर अनेकांना माहित नसेल. किती जाड झाली आहेस? अशी कमेंट एखाद्यावर काही लोक सहज करतात. पण हे वाक्य म्हणताना समोरच्या व्यक्तीचा विचार करणं देखील महत्वाचं आहे. बॉडी शेमिंग, वाढलेलं वजन या सगळ्या विषयांवर 'डबल एक्सएल' (Double XL) नावाच्या चित्रपटाचं कथानक अधारित आहे. या चित्रपटात दोन अशा तरुणींची गोष्ट दाखवण्यात आली आहे, ज्या 'चबी गर्ल' आहेत. या तरुणींना 'सो कॉल्ड' फिगर नसल्यानं अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 


सायरा आणि राजश्री या दोन तरुणींची गोष्ट डबल एक्सएल या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. सायरा ही फॅशन डिझायनर असते. तर राजश्रीला स्पोर्ट्स प्रेजेंटर व्हायचे असते. स्पोर्ट्स प्रेजेंटर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राजश्रीला तिच्या वजनामुळे एक कंपनी रिजेक्ट करते. तर सायराला देखील तिच्या वजनामुळे तिचा प्रियकर फसवतो. दु:खी झालेल्या सायरा आणि राजश्री यांची अचानक दिल्लीमध्ये  भेट होते. दोघी संवाद साधून एकमेकांसमोर मन मोकळं करतात.  सायराला एक प्रोजेक्टसाठी लंडनला जायचे असते. या प्रोजेक्टच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सायरा ही राजश्रीला देते. कारण राजश्री हे विविध स्पोर्ट संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. या व्हिडीओचं दिग्दर्शन राजश्री स्वत: करत असते. त्यामुळे सायरा तिच्या लंडनमधील प्रोजेक्टच्या दिग्दर्शनाचं काम राजश्रीला देते. 


लंडनमध्ये सायरा आणि राजश्री यांच्यासोबत अनेक घटना घडतात. लंडनमध्ये असतानाच राजश्रीला कपिल देव यांची मुलाखत घेण्याची संधी देखील मिळते. सायराचा प्रोजेक्ट पूर्ण होतो का? राजश्री स्पोर्ट प्रेजेंटर होते का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील, तर तुम्हाला डबल एक्सएल हा चित्रपट बघावा लागेल. पण माझ्या मते, हा वन टाईम व्हॉच चित्रपट आहे. केवळ टाईमपास म्हणून हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. कारण बॉडी शेमिंग, फॅट शेमिंग याला सध्याची तरुण पिढी गांभीर्यानं घेत नाही. तरुण पिढी सध्या एखाद्या व्यक्तीच्या वजनापेक्षा 'वजनदार' व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष देते, असं माझं मत आहे. 


चित्रपटाची कास्ट


डबल एक्सएल या चित्रपटामधील सायरा ही भूमिका सोनाक्षी सिन्हानं साकारली आहे. तर या चित्रपटामधील राजश्री ही भूमिका हुमा कुरेशीनं साकारली आहे. या चित्रपटामध्ये सोनाक्षी आणि हुमानं चांगलं काम केलं आहे, पण चित्रपटाच्या कथानक चांगलं नसल्यानं त्या दोघींच्या अभिनयाकडे दुर्लक्ष होतं आणि चित्रपट कंटाळवाणा वाटतो, असं माझं मत आहे. झहीर इक्बाल,  महत राघवेंद्र यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. डबल एक्सएल हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 


Almost Pyaar with DJ Mohabbat : प्रेमाची नवी परिभाषा सांगणारा 'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे'