Ananya: आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात चांगले-वाईट प्रसंग येत असतात. या प्रसंगाचा खंबीरपणे सामना करत आयुष्याकडे नव्या दृष्टीने पहायला हवं हा मोलाचा संदेश देणाऱ्या अनन्या (Ananya) सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या 12 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता प्रवाह पिक्चरवर (Pravah Picture) पाहायला मिळणार आहे. अनन्या ही मध्यमर्गीय कुटुंबातील मुलगी. अनन्या ही अतिशय हुशार आणि आयुष्यावर भरभरुन प्रेम करणारी मुलगी आहे. 


अनन्याचं हसतं खेळतं आयुष्य एका अपघाताने पुरतं बदलून जातं. तिला तिचे हात गमवावे लागतात. आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव गमावल्यानंतरही खचून न जाता या परिस्थितीशी अनन्या कसा संघर्ष करते याची प्रेरणादायी गोष्ट सिनेमातून उलगडेल. लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळेने  (Hruta Durgule)  अनन्या भूमिका साकारली असून अमेय वाघ (Amey Wagh), चेतन चिटणीस, ऋचा आपटे, योगेश सोमण, सुव्रत जोशी (Suvrat Joshi) हे कलाकारही सिनेमात लक्षवेधी भूमिकेत आहेत. सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केलं आहे.






प्रवाह पिक्चर वाहिनीला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. पावनखिंड (Pawankhind), झिम्मा (Jhimma), चंद्रमुखी (Chandramukhi), कारखानिसांची वारी, दगडी चाळ 2 (Daagadi Chawl 2), सरसेनापती हंबीरराव अश्या अनेक सुपरहिट सिनेमांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर नंतर पाहायला विसरु नका अनन्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार 12 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता फक्त प्रवाह पिक्चरवर.


रुईया महाविद्यालयाची 'अनन्या' (Ananya) एकांकिका प्रचंड गाजली होती. या एकांकिकेत स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर या एकांकिकेचे नाटकात रुपांतर करण्यात आले. नाटकात ऋतुजा बागवेने अनन्याचे पात्र साकारले होते. नुकताच या नाटकाचा 300 वा गौरवशाली प्रयोग रंगला. अनन्या सिनेमाविषयी हृता दुर्गुळे म्हणते,"आयुष्य खूप सुंदर आहे. ते मनमुराद जगावे. खूप उर्जा आणि सकारात्मकता देणारा हा सिनेमा आहे" ह्रताच्या 'मन उडू उडू झालं' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील तसेच ह्रताच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.  तिचा टाईमपास-3 हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : सिड-कियाराच्या लग्नसोहळ्यात चर्चा रंगली नववधूच्या दागिन्यांची; जाणून घ्या 'ब्राइडल लूक'बद्दल...