Selfiee Movie Review : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सेल्फी' (Selfiee) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा 'ड्रायविंग लायसेसं' (Driving Licence) या मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात अक्षयसह इमरान हाशमीदेखील (Emraan Hashmi) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


'सेल्फी' या सिनेमाचं कथानक काय आहे? (Selfiee Movie Story)


'सेल्फी' (Selfiee) या सिनेमात अक्षय कुमार सुपरस्टार विजय कुमारच्या भूमिकेत आहे. तर इमरान हाशमी भोपाळमधील एक आरटीओ (RTO) ऑफिसर ओम प्रकाश अग्रवालच्या भूमिकेत आहे. ओम प्रकाश अग्रवालचा विजय कुमारचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याचा प्रत्येक सिनेमा त्याने 'फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहिला आहे. ओम प्रकाशचा मुलगादेखील विजयचा मोठा चाहता आहे. 


एक दिवस ओम प्रकाश अग्रवालच्या कानावर येतं की, विजय कुमार त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी भोपाळमध्ये येणार आहे. ही गोष्ट ओम प्रकाश अग्रवालच्या कानावर येताच त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्याचं आणि त्याच्या मुलाचं विजयसोबत एक 'सेल्फी' काढण्याचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न मात्र अपूर्णचं राहतं आणि स्वप्नात विचारदेखील न केलेली गोष्ट घडते. 


विजयला शूटिंगदरम्यान ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता असते. त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की, त्याचं लायसन्स हरवलं आहे. त्यानंतर तो ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आरटीओ ऑफिसला पोहोचतो आणि ओमप्रकाशची भेट घेतो. विजय आरटीओ ऑफिसमध्ये पोहोचण्याआधीच पत्रकार तिथे आलेले असतात. विजयला वाटतं की, ओमप्रकाशने मुद्दाम त्याचं नाव खराब करण्यासाठी पत्रकारांना बोलावलं आहे. आता सिनेमात खरा ट्वीस्ट येतो. आता पुढे काय होणार हे प्रेक्षकांना सिनेमात कळेल.


अक्षय कुमारच्या स्टारडमचा पुरेपुर वापर 'सेल्फी' या सिनेमात करण्यात आला आहे. दुसरीकडे इमरान हाशमीनेदेखील आपली भूमिका चोख निभावली आहे. नुसरत आणि डाननानेदेखील चांगलं काम केलं आहे. 'सेल्फी' या सिनेमातील गाणीदेखील चांगली आहेत. 


'सेल्फी' (Selfiee) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राज मेहताने सांभाळली आहे. 'जुग जुग जियो' आणि 'गुड न्यूज' या सिनेमांप्रमामे 'सेल्फी' या सिनेमातदेखील विनोदाचा तडका आहे. एक चाहता त्याच्या लाडक्या सुपरस्टारला भेटण्यासाठी किती वेडा होता हे या सिनेमा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'सेल्फी' हा सिनेमा प्रेक्षक एकदाच पाहू शकतो. हा कौटुंबिक सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे.