Akshay Kumar On Canada Passport : खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारची (Akshay Kumar) गणना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत केली जाते. सध्या 'सेल्फी' (Selfiee) या सिनेमामुळे अभिनेता चर्चेत आहे. दरम्यान, एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने कॅनडाचं नागरिकत्व (Canadian Citizenship) सोडणार असल्यावर भाष्य केलं आहे. 


अक्षय कुमारचं नागरिकत्व कॅनडाचं असल्याने त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. अशातच अक्षयने कॅनडाचं नागरिकत्व सोडणार असल्याचं वक्तव्य करत टिकाकारांची बोलती बंद केली आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला, "भारत माझ्यासाठी सर्वकाही आहे". 


अक्षय कुमार पुढे म्हणाला, "माझ्याकडे कॅनडाचं नागरिकत्व असल्याने अनेकांनी मला ट्रोल केलं आहे. सत्य माहीत नसताना लोक त्या गोष्टीवर आपली प्रतिक्रिया देतात आणि ट्रोल करायला सुरुवात करतात. या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. बॉलिवूडमध्ये माझे 15 सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतरदेखील मला भारताचं नागरिकत्व न मिळता कॅनडाचं मिळालं होतं". 


अक्षय कुमार पुढे म्हणाला, "माझे सिनेमे फ्लॉप होत होते. त्यामुळे माझ्या एका मित्राने मला कॅनडात येण्यास सांगितले. त्यावेळी त्याने मला कॅनडाचं नागरिकत्व मिळवून दिलं. त्यानंतर मी पुन्हा भारतात आलो आणि काम करायला सुरुवात केली. त्यानंतर माझे अनेक सिनेमे सुपरहिट झाले. माझ्याकडे कॅनडाचा पोसपोर्ट आहे हे मी विसरलो होतो. पण आता मी पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज दाखल केला आहे". 






खिलाडी कुमारचे आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या...


अक्षय कुमारचा बहुचर्चित 'सेल्फी' (Selfiee) हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात इमरान हाशमी, नुसरत भरुचा आणि डायना पेंटी मुख्य भूमिकेत आहेत. विनोदी-नाट्य असणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन राज मेहताने केलं आहे. हा सिनेमा 2019 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'ड्रायविंग लाइसेंस' या मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. तसेच खिलाडी कुमारने आता परेश रावल आणि सुनील शेट्टीसह 'हेरा फेरी 3'च्या शूटिंगलादेखील सुरुवात केली आहे. तसेच 'बडे मिया छोटे मिया' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Akshay Kumar : 'सेल्फी किंग' अक्षय कुमार; तीन मिनिटांत घेतल्या तब्बल 184 सेल्फी; मोडला 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'